Share

Uddhav Thackeray | राज्यात पुन्हा एकदा काका-पुतणे येणार आमने-सामने! ठाकरे गटात होणार प्रवेश

🕒 1 min read Uddhav Thackeray | मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेचे दोन गट पडले आहे. या घटनेनंतर बहुतांश नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पक्ष बांधलेला सुरुवात केली होती. अशात उद्धव ठाकरे यांची ताकद हळूहळू वाढताना दिसत आहे. Related News for Youसंजय पाटील … Read more

Published On: 

🕒 1 min read

Uddhav Thackeray | मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेचे दोन गट पडले आहे. या घटनेनंतर बहुतांश नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवला होता.

त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पक्ष बांधलेला सुरुवात केली होती. अशात उद्धव ठाकरे यांची ताकद हळूहळू वाढताना दिसत आहे.

काही दिवसापूर्वी शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा नगर जिल्ह्यातील नेते ठाकरे सामील होणार आहे.

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते (Babanrao Pachpute) यांचे पुतणे साजन पाचपुते (Sajan Pachpute) हे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी ट्विट करत दिली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी आज संध्याकाळी पाच वाजता साजन पाचपुते यांचा हा पक्षप्रवेश होणार आहे. त्यांच्या या पक्षप्रवेशानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा काका-पुतणे आमने-सामने येताना दिसणार आहे.

साजन पाचपुते यांच्या पक्षप्रवेशानंतर ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) ताकतीत वाढ, तर शिंदे यांच्या चिंतेत भर पडणार आहे.

Sajan Pachpute has close relations with Sanjay Raut

दरम्यान, भाजप नेते बबनराव पाचपुते यांचे साजन पाचपुते पुतणे आहे. साजन पाचपुते यांचे खासदार संजय राऊत यांच्याशी जवळचे संबंध आहे.

साजन पाचपुते यांच्याकडं काष्टी तालुक्यातील सरपंच आणि बाजार समितीचे संचालक पद आहे. साजन पाचपुते यांच्या पक्षप्रवेशाबद्दल खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

“नगर जिल्ह्यातल्या राजकारणातील आणखी एक पॉवर फुल पुतण्या आज शिवसेनेत! साजन पाचपुते आज वाजत गाजत शिवसेनत प्रवेश करणार! मातोश्री. 5 वाजता”, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही