Share

Vijay Wadettiwar | भाजपची ही शेवटची निवडणूक असेल – विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar | नागपूर: आगामी निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) सध्या विदर्भ दौऱ्यावर आहे. त्यांच्या या दौऱ्यावरून विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर खोचक टीका केली आहे. आगामी निवडणूक भाजपची शेवटची निवडणूक असेल, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. वडेट्टीवार यांच्या या … Read more

Published On: 

Vijay Wadettiwar | नागपूर: आगामी निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) सध्या विदर्भ दौऱ्यावर आहे.

त्यांच्या या दौऱ्यावरून विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर खोचक टीका केली आहे. आगामी निवडणूक भाजपची शेवटची निवडणूक असेल, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

वडेट्टीवार यांच्या या टीकेनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Women are not respected in Rashtriya Swayamsevak Sangh – Vijay Wadettiwar 

विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, “धार्मिक तेढ, जातीय तेढ आणि द्वेष निर्माण करण्याची भारतीय जनता पक्षाची विचारधारा आहे. भाजपची ही विचारधारा आरएसएसमधून आली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये महिलांचा सन्मान होत नाही. स्त्रियांनी शिक्षण घेऊ नये, अशी भूमिका संघानं अनेक पुस्तकातून मांडली आहे. इतिहास सांगण्यासारखं भारतीय जनता पक्षाकडं काहीच नाही.

इंग्रजांचं आणि मुघलांचं राज्य असताना या विचारसरणीची लोकं सत्ताधारी पक्षासोबत होती. मात्र, सत्ता हातात आल्यावर ही लोकं देशाची विभागणी करू पाहत आहे. म्हणून 2024 ची निवडणूक भारतीय जनता पक्षाची शेवटची निवडणूक असेल.”

यावेळी बोलत असताना विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) शरद पवारांनी (Sharad Pawar) अजित पवारांबाबत (Ajit Pawar) केलेल्या वक्तव्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, “शरद पवार हे पुरोगामी विचाराला धरून चालणारे नेते आहे. ते कायम या विचारांसोबत राहतील. अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्य मागे शरद पवार यांची काही रणनीती असू शकते.

शरद पवार साहेब इंडिया आघाडीसोबत आहे. त्याचबरोबर ते कायम महाविकास आघाडीसोबत राहतील. शरद पवार यांनी अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामध्ये तुम्हाला विसंगती दिसत असेल.

मात्र, त्यांच्या त्या वक्तव्याचा आम्हाला फारसा वेगळा अर्थ दिसत नाही. त्यांच्या वक्तव्यामध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारचा संभ्रम वाटत नाही. शरद पवार जे काय मत मांडतात त्यातून इंडिया आणि महाविकास आघाडीला फायदा होतो, असं मला वाटतं.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही