Share

Supriya Sule | अजित पवारांचं नेतृत्व मान्य आहे? सुप्रिया सुळे म्हणतात…

Supriya Sule | पुणे: आज सकाळी शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवारांबद्दल (Ajit Pawar) मोठं विधान केलं होतं. अजित पवार आमचेच नेते आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीमध्ये फुट नाही, असं शरद पवार यांनी आज सकाळी म्हटलं होतं. त्यानंतर आज दुपारी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना शरद पवारांनी वेगळी भूमिका बजावली आहे. अजित पवार आमचे नेते आहे … Read more

Published On: 

Supriya Sule | पुणे: आज सकाळी शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवारांबद्दल (Ajit Pawar) मोठं विधान केलं होतं. अजित पवार आमचेच नेते आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीमध्ये फुट नाही, असं शरद पवार यांनी आज सकाळी म्हटलं होतं.

त्यानंतर आज दुपारी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना शरद पवारांनी वेगळी भूमिका बजावली आहे. अजित पवार आमचे नेते आहे हे मी म्हणालो नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. या प्रकरणावरून पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना अजित पवारांबाबत प्रश्न विचारला.

Is Ajit Pawar’s leadership acceptable?

अजित पवार यांचं नेतृत्व मान्य आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना विचारला आहे. या प्रश्नाचं उत्तर देत सुप्रिया सुळे म्हणाल्या, “प्रत्येक पक्षामध्ये चांगले नेते असतात.

त्याचबरोबर प्रत्येकामध्ये चांगले गुण देखील असतात. अजित पवार यांचं नेतृत्व संपूर्ण राज्याला मान्य आहे. अटल बिहारी बाजपेयी, एनडी पाटील आदींचं नेतृत्व आम्ही मान्य केलं होतं. नेत्यांमधील नेतृत्व आणि त्यांचे गुण समाजाला मान्य असतात.”

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट नाही, असं वक्तव्य शरद पवार आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, “माझ्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडलेली आहे. पक्ष आणि पक्षप्रमुखाचे विचार बाजूला ठेवून शिवसेनेतून एक गट बाजूला झाला होता.

त्यांनी पक्षद्रोह केल्यानंतर आम्ही त्यांची हकालपट्टी केली आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीतून एक गट बाहेर पडला आहे. या गटानं आपले विचार बाजूला ठेवून भाजपची हातमिळवणी केली आहे.

त्यानंतर पक्षानं अजित पवार यांच्यासह काही प्रमुख नेत्यांची हकालपट्टी केली आहे. याला फूट नाही तर काय म्हणायचं? आम्ही याला फूटचं म्हणतो.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही