Share

Supriya Sule | अजित पवारांसाठी परतीचा मार्ग खुला आहे? सुप्रिया सुळे म्हणतात…

Supriya Sule | मुंबई: अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीला एक महिन्याहून अधिक काळ उलटून गेला आहे. मात्र, या कालावधीमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट दोन्हीमध्ये मतभेद असल्याचं दिसून आलं नाही. अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्या वारंवार बैठकी होतच राहिल्या. या सर्व प्रकरणानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं … Read more

Published On: 

Supriya Sule | मुंबई: अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीला एक महिन्याहून अधिक काळ उलटून गेला आहे. मात्र, या कालावधीमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट दोन्हीमध्ये मतभेद असल्याचं दिसून आलं नाही.

अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्या वारंवार बैठकी होतच राहिल्या. या सर्व प्रकरणानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

अजित पवार गटाशी आमचा वैचारिक लढा आहे. परंतु, कुटुंब म्हणून आम्ही एकत्र असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

We have an ideological fight with the Ajit Pawar group – Supriya Sule

अजित पवारांसाठी परतीचा मार्ग खुला आहे का? या प्रश्नाचं उत्तर देत सुप्रिया सुळे म्हणाल्या, “या सर्व घटना आमच्यासाठी खूप निराशाजनक आहे.

मात्र, त्यांना परत येण्याची परवानगी आहे, असं नाही. त्याचबरोबर ते परत येतील की नाही याबद्दल मी काहीच सांगू शकत नाही. परंतु, कुटुंब म्हणून आम्ही एकत्र राहण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत.

कुटुंबामध्ये राजकारण येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. कारण अजित पवार गटाशी आमचा वैचारिक लढा आहे आणि कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत.”

राष्ट्रवादीचे नेते आणि अजित पवार भाजपसोबत गेले हे तुम्हाला अपेक्षित होतं का? यावर सुप्रिया सुळे (Supriya Sule) उत्तर देत म्हणाल्या, “अजित पवार काही आमदारांसह भाजप सोबत गेले यामागे काहीतरी विशेष कारण असेल.

मात्र, पक्षात बंडखोरी केलेल्या नेत्यांनी कोणत्याही प्रकारचे आरोप केलेले नाही. भाजपसोबत जायचं की नाही? हा एकच त्यांच्या समोर प्रश्न होता. पक्षातील काही नेत्यांना भाजपसोबत जाणं योग्य वाटलं आणि ते भाजपसोबत गेले. मात्र, आम्हाला ते योग्य वाटलं नाही.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही