Share

Ambadas Danve | सध्याचं सरकार जुलमी पद्धतीनं शासन चालवतयं – अंबादास दानवे

Ambadas Danve | छत्रपती संभाजीनगर: सरकार जनतेच्या हितासाठी अनेक योजना राबवत असतं. याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. सरकारनं आतापर्यंत 778 योजना सुरू केल्या आहे. मात्र, यामधील 700 योजना ग्रामीण भागातील लोकांना माहीतच नाही, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. The government has launched 778 government schemes … Read more

Published On: 

Ambadas Danve | छत्रपती संभाजीनगर: सरकार जनतेच्या हितासाठी अनेक योजना राबवत असतं. याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

सरकारनं आतापर्यंत 778 योजना सुरू केल्या आहे. मात्र, यामधील 700 योजना ग्रामीण भागातील लोकांना माहीतच नाही, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

The government has launched 778 government schemes since 2014 – Ambadas Danve

अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले, “राज्य सरकार जुलमी पद्धतीनं शासन चालवत आहे. शासनानं फक्त गाजावाजा करत योजना कागदपत्रावर दाखवल्या आहे.

मात्र प्रत्यक्षात त्या बहुसंख्य लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाही. शासन फक्त बडेजाव करत ‘शासन आपल्या दारी’ सारखे उपक्रम राबवत आहे. परंतु, या कार्यक्रमांचा कोणालाही फायदा होत नाही.

केंद्र आणि राज्य सरकारनं 2014 पासून 778 शासकीय योजना सुरू केल्या आहे. पण यामधील 700 योजना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आणि गरजूंना माहीतच नाही.”

पुढे बोलताना ते (Ambadas Danve) म्हणाले, “आतापर्यंत सरकारनं फक्त या योजनांची घोषणा केली आहे. प्रत्यक्षामध्ये या योजनांचा  लाभ कुणालाही मिळालेला नाही. 778 योजनेंपैकी 08 योजनांचा सुद्धा कुणाला लाभ मिळालेला नाही.

ही परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला देशातील आणि राज्यातील शासन बदलायला हवं. शासन बदलण्यासाठी आम्ही पक्का निर्धार केला आहे.”

“यावर्षी मोदी सरकारला सत्तेत येऊन 09 वर्ष झाली आहे. मात्र, अद्यापही देशातील ग्रामीण भागात वीज पोहोचलेली नाही. मोदी सरकारनं फक्त प्रत्येक घरात वीज पोहोचवण्याचं महत्त्वकांक्षी ध्येय ठेवलं होतं.

पण प्रत्यक्षात असं काही झालेलं नाही. अशीच अवस्था हर घर नळ योजनेची सुद्धा झाली आहे. अजून पर्यंत लोकांना घरापर्यंत पाणी मिळालेलं नाही”, असंही ते (Ambadas Danve) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही