🕒 1 min read
Cabinet Expansion | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार गट सत्तेत सामील झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार झाला होता. या विस्तारामध्ये शिंदे गटातील आमदारांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
अशात राज्य मंत्रिमंडळाचा पुन्हा विस्तार होण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे. ऑगस्ट महिन्यात राज्य मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिंदे गटातील आमदारांना मंत्रीपद मिळणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहे.
MLAs from Ajit Pawar group got a chance in the second cabinet expansion
शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून दोन वेळा राज्य मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) झाला आहे. मात्र, दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी राष्ट्रवादी अजित पवार गट देखील सत्तेत सामील झाला होता.
दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार गटातील काही आमदारांना संधी मिळाली होती. त्यामुळं भाजप आणि शिंदे गटातील आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती.
मात्र, तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नाराज आमदारांना खुश करण्यासाठी तिन्हीही पक्ष प्रयत्न करणार आहे. गेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये (Cabinet Expansion) शिंदे गटातील आमदारांच्या मंत्रिपदाच्या अपेक्षावर पाणी फिरलं होतं.
त्यामुळं आता होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिंदे गटातील आमदारांना संधी दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबरोबरच पालकमंत्र्यांची नियुक्ती आणि खातेवाटपावर देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
दरम्यान, अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर सर्व महत्त्वाची खाती शिंदे गटला मिळण्याऐवजी राष्ट्रवादीला मिळाली असल्याचं बोललं जात आहे.
यामुळे शिंदे गटातील आमदार नाराज असल्याच्या चर्चा देखील होत्या. त्यामुळं या मंत्रिमंडळ विस्तारात (Cabinet Expansion) चांगली खाती मिळवण्यासाठी सर्व पक्ष प्रयत्नात असल्याचं दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis | “संभाजी भिडे हे हिंदुत्वासाठी काम…”; देवेंद्र फडणवीसांचं ‘ते’ विधान चर्चेत
- Aditya Thackeray | “सत्तेत असलेले स्त्रियांबद्दल गलिच्छ बडबड…”; आदित्य ठाकरेंची राज्य सरकारवर खोचक टीका
- Bacchu Kadu | “राहुल गांधींनी सावरकरांबद्दल पुरावे दिले होते, मात्र भिडेंनी…”; बच्चू कडूंचं खळबळजनक वक्तव्य
- Ambadas Danve | संभाजी भिडेंचं संरक्षण सरकार करतयं – अंबादास दानवे
- Nitin Desai | नितीन देसाई यांनी का केली आत्महत्या? जाणून घ्या सविस्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











