Share

Eknath Shinde | शिंदे गटातील आमदाराची झाली तब्बल साडेसात कोटींची फसवणूक, नक्की काय आहे प्रकरण?

Eknath Shinde | ठाणे: सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात कधी काय घडेल? याचा अंदाज बांधणे कठीण नाही तर अशक्य झाले आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांची तब्बल साडेसात कोटींची फसवणूक झाली असल्याची माहिती मिळाली आहे. जमीन व्यवहारात प्रताप सरनाईक यांची ही फसवणूक झाल्याची माहिती मिळाली आहे. … Read more

Published On: 

Eknath Shinde | ठाणे: सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात कधी काय घडेल? याचा अंदाज बांधणे कठीण नाही तर अशक्य झाले आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांची तब्बल साडेसात कोटींची फसवणूक झाली असल्याची माहिती मिळाली आहे.

जमीन व्यवहारात प्रताप सरनाईक यांची ही फसवणूक झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहे.

Pratap Sardesai has been cheated in the land transaction at Ghodbunder Road

ठाण्यातील घोडबंदर रोड येथील एका जमिनीच्या व्यवहारात प्रताप सरदेसाई यांची ही फसवणूक झाली (Eknath Shinde) आहे. सरदेसाई यांनी जमीन खरेदी करण्यासाठी काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीशी संपर्क साधला होता.

मार्टीन बर्नार्डो, कोरिया असं त्या व्यक्तीचं नाव आहे. जमीन व्यवहाराच्या पहिल्या टप्प्यात त्या व्यक्तीनं सरनाईक यांच्याकडे साडेतीन कोटींची मागणी केली.

जमिनीच्या व्यवहारासाठी सरनाईकांनी त्या व्यक्तीला साडेतीन कोटी रुपये दिले. मात्र, त्यानंतर मार्टीन बर्नार्डो यांनी सरनाईकांच्या नावावर जमीन केली नाही. त्याचबरोबर त्यांनी पैसे देखील परत केले नाही.

दरम्यान, प्रताप सरनाईक 2021 पासून या जमिनीच्या व्यवहारासाठी प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे. पण, मार्टीन बर्नार्डो यांनी जमीन व्यवहार करण्यासाठी टाळाटाळ केली.

त्यामुळे सरनाईक यांनी संबंधित व्यक्ती विरोधात (Eknath Shinde) पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करायला सुरुवात केली आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप संबंधित व्यक्तीला अटक केलेलं नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही