Rupali Patil Thombare | अजितदादा विलन वाटत असले, तरी येणाऱ्या काळात तेच हिरो – रूपाली पाटील ठोंबरे

Rupali Patil Thombare | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालेले असून 2 जुलै रोजी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर रूपाली पाटील ठोंबरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Ajit Pawar has joined the … Read more

Published On: 

Rupali Patil Thombare | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालेले असून 2 जुलै रोजी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर रूपाली पाटील ठोंबरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Ajit Pawar has joined the ruling party as an friend – Rupali Patil Thombare

रूपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) म्हणाल्या, “राष्ट्रवादीनं याआधी देखील भाजपला बाहेरून पाठिंबा दिला आहे. विरोधक म्हणून काम करत असताना संविधात्मक पद्धतीनं अजित पवार सत्ताधाऱ्यांसोबत मित्रपक्ष म्हणून सामील झाले आहे.”

पुढे बोलताना त्या (Rupali Patil Thombare) म्हणाल्या, “सध्या सगळे म्हणतात राजकारणाचा चिखल झाला आहे. त्यामुळे हा चिखल साफ करण्यासाठी कुणाला तरी त्यामध्ये उतरावं लागणार आहे. सध्या अजित पवार लोकांना विलन वाटत असतील तरी येणाऱ्या काळात ते हिरो असणार आहे.”

“अजित पवार यांच्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले आहे. त्यामुळे आमच्या आयुष्यात जे काही चांगलं वाईट व्हायचं आहे ते अजित पवार यांच्या सोबतच होणार आहे. सध्या जे घडत आहे त्याबद्दल अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार शरद पवारांना आहे”, असं मत देखील रूपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी व्यक्त केलं होतं.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही