Eknath Shinde | शिंदे गटच्या ताकदीत वाढ! ‘या’ नेत्यांचा शिंदे गटात प्रवेश

Eknath Shinde | ठाणे: सध्या राज्याच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडत आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह 40 आमदार बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. त्यांच्या या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकीय राजकारणात मोठा भूकंप आला आहे. अशात आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या नेत्यांनं शिंदे गटात प्रवेश केला आहे. Shishir Shinde will join Shinde group माजी … Read more

Published On: 

Eknath Shinde | ठाणे: सध्या राज्याच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडत आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह 40 आमदार बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. त्यांच्या या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकीय राजकारणात मोठा भूकंप आला आहे. अशात आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या नेत्यांनं शिंदे गटात प्रवेश केला आहे.

Shishir Shinde will join Shinde group

माजी आमदार शिशिर शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. शिशिर शिंदे यांच्यासोबतच ठाकरे गटाचे नेते विलास पारकर देखील शिंदे गटात सामील होणार आहेत.

शिवसेना शिंदे गटाची ताकद दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राजकीय नेत्यांबरोबरच मराठी सिनेसृष्टीतील कलाकार देखील शिंदे गटात प्रवेश करत आहेत. अक्षया देवधर, माधव देवचाके, आदिती सारंगधर, हार्दिक जोशी इत्यादी कलाकार आज शिंदे गटात प्रवेश करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार आहे.

दरम्यान, अजित पवार 40 आमदारांसह भाजप-शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्याचबरोबर 9 मंत्र्यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या 9 मंत्र्यांच्या विरोधात जयंत पाटील यांनी अपात्रतेची याचिका दाखल केली आहे.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही