Viral News | दीड हजाराचा समोसा खा आणि 71 हजार रुपये जिंका, नक्की प्रकरण काय?

Viral News | उत्तर प्रदेश: बाजारामध्ये आपल्याला खाद्यपदार्थ, कपडे इत्यादी गोष्टींवर नेहमी वेगवेगळ्या ऑफर्स मिळतात. उत्तर प्रदेशमधील मेरठ शहरात एका दुकानदारानं एक खास ऑफर ग्राहकांना दिली आहे. या दुकानदारानं तब्बल 12 किलो वजनाचा बाहुबली समोसा तयार केला आहे. हा समोसा खाणाऱ्यासाठी दुकानदारानं 71 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. मेरठच्या लालकुर्ती येथील शुभम कौशल यांच्या … Read more

Published On: 

Viral News | उत्तर प्रदेश: बाजारामध्ये आपल्याला खाद्यपदार्थ, कपडे इत्यादी गोष्टींवर नेहमी वेगवेगळ्या ऑफर्स मिळतात. उत्तर प्रदेशमधील मेरठ शहरात एका दुकानदारानं एक खास ऑफर ग्राहकांना दिली आहे. या दुकानदारानं तब्बल 12 किलो वजनाचा बाहुबली समोसा तयार केला आहे. हा समोसा खाणाऱ्यासाठी दुकानदारानं 71 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.

मेरठच्या लालकुर्ती येथील शुभम कौशल यांच्या कौशल स्वीट्समध्ये हा समोसा (Viral News) बनवण्यात आला आहे. या समोस्याचं वजन 12 किलो आहे. 30 मिनिटांमध्ये हा समोसा खाणाऱ्याला शुभम कौशल यांच्याकडून 71 हजार रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू आहे.

It takes around 06 hours to make Baahubali Samosa

शुभम कौशल यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाहुबली समोसा (Viral News) तयार करण्यासाठी सुमारे 06 तास वेळ लागतो. तीन आचारी हा समोसा तयार करतात. हा समोसा तळण्यासाठी 90 मिनिटे लागतात. अॅडव्हान्स ऑर्डर दिल्यानंतरच हा समोसा बनवला जातो.”

“जेव्हा आम्ही बाहुबली समोसा (Viral News) बनवायचं ठरवलं होतं, तेव्हा आम्ही फक्त चार किलोचा समोसा तयार केला होता. त्यानंतर आम्ही आठ किलोचा समोसा बनवला. त्यानंतर याची मागणी वाढल्यानंतर आम्ही 12 किलोचा समोसा तयार करण्याचं ठरवलं. आमचा हा समोसा देशातील सर्वात मोठा समोसा आहे,” असही कौशल यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही