Abdul Sattar | कृषी महामंडळात 150 कोटींचा घोटाळा; दैनिक सामनातून अब्दुल सत्तारांवर गंभीर आरोप

Abdul Sattar | मुंबई: राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे नाव नेहमी वेगवेगळे घोटाळ्यांमध्ये जोडले जाते. एका खत कंपनीत कृषी विभागाच्या कथित पथकाने टाकलेल्या धाडेत अब्दुल सत्तार यांचे स्वीय सहायक दीपक गवळी यांचं नाव आलं होत. दीपक गवळी हा माझा स्वीय सहायक नाही, अशी प्रतिक्रिया सत्तरांनी दिली होती. मात्र, एका शासकीय दौऱ्यामध्ये त्यांनी दीपक गवळीचा स्वीय … Read more

Published On: 

Abdul Sattar | मुंबई: राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे नाव नेहमी वेगवेगळे घोटाळ्यांमध्ये जोडले जाते. एका खत कंपनीत कृषी विभागाच्या कथित पथकाने टाकलेल्या धाडेत अब्दुल सत्तार यांचे स्वीय सहायक दीपक गवळी यांचं नाव आलं होत. दीपक गवळी हा माझा स्वीय सहायक नाही, अशी प्रतिक्रिया सत्तरांनी दिली होती. मात्र, एका शासकीय दौऱ्यामध्ये त्यांनी दीपक गवळीचा स्वीय सहाय्यक म्हणून उल्लेख केला होता.

150 crores scam in Agriculture Industry Development Corporation

कृषी उद्योग विकास महामंडळात 150 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप दैनिक सामनातून करण्यात आला आहे. त्याचबरोबर कीटकनाशकच्या टेंडरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप सामनाच्या माध्यमातून अब्दुल सत्तारांवर करण्यात आला आहे. निविदेतील अटी शर्ती भरणास गुंडाळून सत्तार (Abdul Sattar) यांच्या मर्जीतील कंपनीच्या घशात हे कंत्रात घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे.

याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अंबादास दानवे म्हणाले, “राज्यातील कृषी विभाग (Abdul Sattar) भ्रष्टाचाराचा मोठा अड्डा बनला आहे. शेतकऱ्यांना न्याय देणार हे खातं आज फक्त भ्रष्टाचार करताना दिसत आहे. अब्दुल सत्तार यांच्या या भ्रष्टाचाराला गृह खात्याचा पाठिंबा आहे का?”

दरम्यान, घोटाळा प्रकरणावरून अब्दुल सत्तार नेहमी वादात सापडताना दिसत आहे. अब्दुल सत्तार आणि भ्रष्टाचार मालिका संपत नसल्याचं यातून स्पष्ट होत आहे. अब्दुल सत्तार घोटाळा प्रकरणांमध्ये सापडत असताना दैनिक सामनातून त्यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या आरोपानंतर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया येतील, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही