Share

Weather Update | वातावरणात पुन्हा होणार बदल! ‘या’ जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेची शक्यता

🕒 1 min read Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा बदल होताना दिसणार आहे. महाराष्ट्रात एकीकडे मान्सूनपूर्व पाऊस धुमाकूळ घालत आहे. तर दुसरीकडे उष्णतेच्या लाटेची तीव्रता वाढत चालली आहे. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पुढील तीन दिवस उष्णतेची लाट (Heat wave) येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी … Read more

Published On: 

🕒 1 min read

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा बदल होताना दिसणार आहे. महाराष्ट्रात एकीकडे मान्सूनपूर्व पाऊस धुमाकूळ घालत आहे. तर दुसरीकडे उष्णतेच्या लाटेची तीव्रता वाढत चालली आहे. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पुढील तीन दिवस उष्णतेची लाट (Heat wave) येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन देखील हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

Heat wave likely to occur in Vidarbha and Madhya Maharashtra

विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात (Weather Update) आली आहे. मोसमी पाऊस सक्रिय होईपर्यंत या भागांमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्याचं बाष्पाचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये विजांसह पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार (Weather Update), राज्यामध्ये सोलापूर, अकोला, वर्धा, चंद्रपूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर उष्णतेत वाढ झाल्याने काही ठिकाणी दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, मान्सूनचा वेग पाहता तामिळनाडू आणि केरळमध्ये 01 जून ते 05 जून दरम्यान मान्सून हजेरी (Weather Update) लागू शकते. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये 10 जून पर्यंत मान्सूनची येऊ शकतो. तर मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, झारखंड, ओडिसा, बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये 15 जून पासून मान्सूनला सुरुवात होईल. राजस्थान, पंजाब, उत्तराखंड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि जम्मू कश्मीरमध्ये 20 जूनपासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही