Gautami Patil | मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमापेक्षा गौतमीच्या कार्यक्रमाला जास्त गर्दी; एकनाथ शिंदेंना टोला

Gautami Patil | पुणे: प्रसिद्ध नृत्यांगण गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला कोणत्याही ठिकाणी तुफान गर्दी असते. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला एवढी गर्दी नसते जेवढी गर्दी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला असते, असं विधान दिलीप मोहिते-पाटील यांनी केलं आहे. Dilip Mohite-Patil criticizes Chief Minister Eknath Shinde एका कार्यक्रमामध्ये बोलताना … Read more

Published On: 

Gautami Patil | पुणे: प्रसिद्ध नृत्यांगण गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला कोणत्याही ठिकाणी तुफान गर्दी असते. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला एवढी गर्दी नसते जेवढी गर्दी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला असते, असं विधान दिलीप मोहिते-पाटील यांनी केलं आहे.

Dilip Mohite-Patil criticizes Chief Minister Eknath Shinde

एका कार्यक्रमामध्ये बोलताना दिलीप मोहिते-पाटील म्हणाले, “गौतमी (Gautami Patil) अत्यंत गरीब परिस्थितीतून आली आहे. ती तिच्या कलेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचली आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलीस अधिकारी तिच्या कार्यक्रमावर बंदी घालतात. मात्र, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला एवढी गर्दी जमत नाही जेवढी तिच्या कार्यक्रमांना जमते.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “गौतमी ( Gautami Patil )ट्रोल होत आहे, हे मला माहित आहे. ती एक कलाकार आहे. ती एक नवीन कलाकार आहे. तिची कला थांबवू नका आणि त्याचबरोबर इतक्या लवकर तिचं आयुष्य संपवू नका, अशी माझी समाजाला विनंती आहे.

Gautami Patil Is A Actor – Dilip Mohite-Patil

दरम्यान, गौतमी पाटील (Gautami Patil) अल्पकालावधीतच आपल्या नृत्याने प्रसिद्ध झाली आहे. तिच्या नृत्यावर अनेकांकडून आक्षेप घेण्यात आला होता. तिच्या नृत्यावर मराठी सिने क्षेत्र ते लावणी कलाकारापर्यंत सर्वांनी प्रतिक्रिया देत तिचा विरोध केला होता.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही