Share

Weather Update | हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांत पावसाचा येलो अलर्ट जारी

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट नोंदवली जात आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा अजूनही चाळिशीच्या पार आहे. त्याचबरोबर राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पाऊस (Rain) धुमाकूळ घालत आहे. कोकण आणि विदर्भातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. Yellow … Read more

Published On: 

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट नोंदवली जात आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा अजूनही चाळिशीच्या पार आहे. त्याचबरोबर राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पाऊस (Rain) धुमाकूळ घालत आहे. कोकण आणि विदर्भातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Yellow alert of rain issued in ‘these’ districts

विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस बरसत आहे. त्याचबरोबर येत्या 24 तासात विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी (Weather Update) करण्यात आला आहे. नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

विदर्भामध्ये पाऊस धुमाकूळ घालत असला तरी उर्वरित राज्यात उन्हाची तीव्रता वाढली (Weather Update) आहे. मंगळवारी (30 मे) नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, बीड आणि जालना या शहरांमध्ये उन्हाची तीव्रता अधिक होती.

दरम्यान, साधारतः नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची सर्वसाधारण तारीख 01 जून असते. मात्र, यंदा मान्सून उशिरा दाखल होणार आहे. केरळमध्ये 04 जून रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात (Weather Update) आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install