Share

Job Opportunity | ‘या’ संघटनेमध्ये नोकरीची संधी! ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: कर्मचारी भविष्य निधी संघटनेमार्फत मोठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार 27 मार्च 2023 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. कर्मचारी भविष्य निधी संघटना … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: कर्मचारी भविष्य निधी संघटनेमार्फत मोठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार 27 मार्च 2023 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

कर्मचारी भविष्य निधी संघटना यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) एकूण 2859 रिक्त पदे  भरण्यात येणार आहे. यामध्ये सामाजिक सुरक्षा सहाय्यक / Social Security Assistant 2674 जागा आणि लघुलेखक / Stenographer 185 जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 27 मार्च 2023 पासून ते दिनांक 26 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://www.epfindia.gov.in/site_en/Recruitments.php

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.epfindia.gov.in/site_en/index.php

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही