Weather Update | राज्यात पुन्हा एकदा पावसाचे संकट, ‘या’ जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात अनेक भागात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) थैमान घातलं आहे. तर बहुतांश भागांमध्ये गारपिटीने (Hail) हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशात आता पुन्हा एकदा राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा येल्लो अलर्ट (Yellow alert) जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

आज (25 मार्च) विदर्भात नागपूरसह सर्व जिल्ह्यांत येल्लो अलर्ट (Yellow alert) जारी करण्यात आला आहे. राज्यात आज वादळी पावसाला पोषक हवामान तयार झालेले आहे. त्यामुळे विदर्भासह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात (Weather Update) आली आहे. तर उर्वरित राज्यांमध्ये उन्हाचा पारा वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये आज हवामान विभागाकडून (Weather Update) पावसाचा येल्लो अलर्ट (Yellow alert) जारी करण्यात आला आहे. नंदुरबार, नाशिक, जळगाव, धुळे, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

शेतीतील पिकांना अवकाळी पावसाचा फटका (Unseasonal rains hit agricultural crops)

राज्यामध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने (Weather Update) हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या रब्बी पिकांची नासाडी झाली आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली होती. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.