Raksha Khadse | “पक्षाने दुसऱ्यांना तिकीट दिले तर मी…”; लोकसभेसा तिकीटावरुन रक्षा खडसेंची प्रतिक्रिया

Raksha Khadse | मुंबई : माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपला रामराम केला आणि राष्ट्रवादीची वाट धरली. एकनाथ खडसे यांनी मागील कित्येक वर्षे भाजप पक्षाचे काम केले. यामुळेच जळगाव जिल्ह्यात भाजपचा विस्तार होऊ शकला. एकनाथ खडसे यांच्या सून आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) आहेत. एकनाथ खडसे यांनी भाजपची साथ सोडल्याने आगामी … Read more

Published On: 

Raksha Khadse | मुंबई : माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपला रामराम केला आणि राष्ट्रवादीची वाट धरली. एकनाथ खडसे यांनी मागील कित्येक वर्षे भाजप पक्षाचे काम केले. यामुळेच जळगाव जिल्ह्यात भाजपचा विस्तार होऊ शकला. एकनाथ खडसे यांच्या सून आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) आहेत. एकनाथ खडसे यांनी भाजपची साथ सोडल्याने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रक्षा खडसे यांना भाजप पक्षाकडून तिकीट देणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत रक्षा खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“पक्षाने दुसऱ्यांना तिकीट दिले तर मी…”

“भविष्यात पक्षाने मला ही जबाबदारी दिली, तर त्याच विश्वासाने मी काम करेन. मात्र पक्षाने दुसऱ्यांना तिकीट दिले तर मी प्रामाणिकपणे काम करेन. आज अनेकांची नावे समोर येत आहेत. त्यांना तिकीट मिळाले तर मी त्यांच्यासाठी काम करेन. मला तिकीट मिळाले तर ते माझ्यासाठी काम करतील,” असे रक्षा खडसे यांनी सांगितले आहे.

“अशी कुठलीही आमच्या पक्षामध्ये चर्चा नाही. तरीदेखील पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल. आज खासदार म्हणून या लोकसभेची जबाबदारी माझ्यावर आहे. भविष्यामध्येही पक्षाने मला पुन्हा रावेर खासदारकीची जबाबदारी दिली. तर मी जबाबदारीने काम करेल”, असं रक्षा खडसे म्हणाल्या आहेत.

पक्षश्रेष्ठींच्या निर्णयानुसार आम्ही काम करू”

“मला वाटतं की लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. एका वर्षापेक्षा कमी कालावधी राहिलेला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र तसेच देशभरात लोकसभा उमेदवारीबाबत वेगवेगळे विषय समोर येत आहेत. मात्र रावेर लोकसभा निवडणुकीबाबत सध्या पक्षात कोणतीही चर्चा नाही. मात्र पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल, त्या अनुषंगाने आम्ही काम करू. आज खासदार म्हणून रावेर लोकसभा मतदारसंघाची माझ्यावर जबाबदारी आहे,” असे रक्षा खडसे म्हणाल्या आहेत

महत्वाच्या बातम्या-

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही