Weather Update | राज्यात थंडीचा कडाका कायम, तर ‘या’ भागांत पाऊसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये आजही थंडी (Cold) चा कडाका कायम आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 15 अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे. त्यामुळे हुडहुडी वाढली आहे. उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा अधिकच घसरला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील थंडी कायम आहे. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी जागोजागी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहे. राज्यामध्ये काही … Read more

Published On: 

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये आजही थंडी (Cold) चा कडाका कायम आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 15 अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे. त्यामुळे हुडहुडी वाढली आहे. उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा अधिकच घसरला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील थंडी कायम आहे. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी जागोजागी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहे.

राज्यामध्ये काही ठिकाणी सातत्याने थंडीचा कडाका वाढत चालला आहे. वाढत्या थंडीमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. या वातावरणाचा थेट नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. राज्यासह उत्तर भारतात देखील थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. उत्तर भारतामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांवर बर्फाची चादर पसरलेली दिसत आहे. त्यामुळे वाहतुकीमध्ये अनेक अडथळे निर्माण झाले आहे. तर उत्तर भारतामध्ये अनेक ठिकाणी पाणी गोठलं आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणींच्या सामना करावा लागत आहे.

वाढत्या थंडीचा शेतकऱ्यांच्या पिकांवर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. राज्यातील कापूस, हरभरा, तूर तसेच केळी या पिकांवर वाढत्या थंडीमुळे मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधीच अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला होता. आता पुन्हा एकदा राज्यातील शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांना धोका निर्माण झाला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, 21 ते 25 जानेवारी दरम्यान सक्रिय वेस्टर्न डिस्टबर्न्सचा वायव्य भारतावर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे. 21 जानेवारीला पहाटे पश्चिम हिमालय भागात मोठ्या प्रमाणात पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. तर, 25 जानेवारी रोजी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि उत्तर पश्चिम भारताच्या मैदानी भागात पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही