Share

किंग कोहलीचा ‘विराट’ विक्रम; फक्त २५ धावा करताच सचिन तेंडुलकरला टाकणार मागे!

विराट कोहली न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत ३ मोठे विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २८,००० धावा पूर्ण करण्यासाठी त्याला फक्त २५ धावांची गरज आहे.

Published On: 

Virat Kohli Records: विराट कोहली इतिहास रचणार! न्यूझीलंडविरुद्ध ३ मोठे विक्रम धोक्यात

🕒 1 min read

Virat Kohli- मैदानावर जेव्हा ‘किंग’ उतरतो, तेव्हा रेकॉर्ड बुकला घाम फुटतो, याचा अनुभव आपण अनेकदा घेतलाय ना? आता पुन्हा एकदा तोच थरार अनुभवायला मिळणार आहे. भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ 2026) यांच्यातील वनडे मालिकेला ११ जानेवारीपासून (रविवार) सुरुवात होत आहे. ३७ वर्षीय विराट कोहली या मालिकेत असे काही विक्रम मोडण्याच्या तयारीत आहे, जे पाहून क्रिकेट जगताचे डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाहीत.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दमदार कामगिरीनंतर विराट आता किवींना भिडायला सज्ज झालाय. पण थांबा, खरी गंमत तर पुढे आहे. या मालिकेत विराटच्या रडारवर एक-दोन नव्हे, तर तब्बल ३ मोठे जागतिक विक्रम आहेत.

Virat Kohli Records ODI 

२८ हजार धावांचा ‘महामेरू’

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विचार केला तर विराट एका ऐतिहासिक टप्प्यावर उभा आहे. विराटने आतापर्यंत ६२३ डावांत २७,९७५ धावांचा डोंगर उभा केलाय. आता फक्त २५ धावा.. होय, फक्त २५ धावा करताच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २८,००० धावा पूर्ण करणारा तिसरा फलंदाज ठरेल. विशेष म्हणजे, सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) (६४४ डाव) आणि कुमार संगकारा (६६६ डाव) यांना मागे टाकत तो सर्वात जलद २८ हजारी बनण्याचा मान मिळवेल.

सचिनचा ‘तो’ विक्रम मोडणार?

इतकेच नाही तर, न्यूझीलंडविरुद्ध वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीयांच्या यादीतही उलथापालथ होऊ शकते. सध्या या यादीत सचिन तेंडुलकर १,७५० धावांसह अव्वल आहे. विराटच्या खात्यात १,६५७ धावा आहेत. म्हणजे, पहिल्या सामन्यात विराटने ९३ धावा केल्या, तर तो सचिनला पछाडून ‘नंबर वन’ बनेल.

जगातील पहिला फलंदाज!

आता तिसरा आणि सर्वात भारी विक्रम. विराटने न्यूझीलंडविरुद्ध आतापर्यंत ६ वनडे शतके ठोकली आहेत. वीरेंद्र सेहवाग आणि रिकी पॉन्टिंग यांच्याही नावावर ६-६ शतके आहेत. या मालिकेत विराटने एक जरी शतक झळकावलं, तर न्यूझीलंडविरुद्ध ७ वनडे शतके करणारा तो जगातील एकमेव फलंदाज ठरेल. त्यामुळे रविवारी टीव्हीसमोर बसताना पॉपकॉर्न तयार ठेवा, कारण ‘विराट’ शो सुरू होणार आहे!

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)