Share

Nana Patole | राज्य सरकार सध्या हवेत असून खाली यायला तयार नाही – नाना पटोले

🕒 1 min readNana Patole | मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. याआधी 18 जुलै रोजी एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) देखील दिल्लीत होते. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. सरकारच्या सध्या फक्त दिल्ली वाऱ्या सुरू असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं … Read more

Published On: 

🕒 1 min read

Nana Patole | मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. याआधी 18 जुलै रोजी एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) देखील दिल्लीत होते.

याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. सरकारच्या सध्या फक्त दिल्ली वाऱ्या सुरू असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

This government has nothing to do with the people – Nana Patole 

प्रसार माध्यमांशी बोलत असताना नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, “राज्य सरकार सध्या खूप हवेत आहे. सरकार सध्या जमिनीवर यायला तयार नाही. कुणाचे आमदार जास्त आहे?

कुणाला मुख्यमंत्री व्हायचं आहे? आणि दिल्लीच्या वाऱ्या किती करायच्या? यामध्येच या सरकारचा वेळ चालला आहे. या सरकारला जनतेशी काही घेणं देणं नाही.”

नाना पटोले (Nana Patole) यांच्या या टीकेला शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. नाना पटोले यांना उत्तर देत संजय शिरसाट म्हणाले, “नाना पटोले दिल्लीमध्ये का गेले होते?

ज्यांना विरोधी पक्षनेता ठरवता येत नाही, ते सध्या आम्हाला अक्कल शिकवत आहे. सरकार चालवणं म्हणजे काही खाऊ नाही. आम्ही ज्या पद्धतीनं मजबुतीनं काम करत आहोत ते बघून यांची पोटदुखी वाढली आहे.”

पुढे बोलताना ते (Nana Patole) म्हणाले, “आज आमचे मुख्यमंत्री कुठपर्यंत पोहोचले आहे, हे अख्ख्या महाराष्ट्रानचं नाही तर संपूर्ण देशानं पाहिलं आहे. हे सरकार जनतेशी किती जुळवून घेत आहे हे सर्वांनी पाहिलं आहे.

त्यामुळेच ही लोक अशी वक्तव्य करत आहे.” पूर्ण अधिवेशन काळापर्यंत नाना पटोले यांनी विधानसभेचा विरोधी पक्ष नेता ठरवून दाखवावा, असं देखील संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!