Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस आहे. रायगड जिल्ह्यात घडलेल्या दुर्घटनेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र, वाढदिवसानिमित्त अजित पवार यांच्या कुंडलीचा आढावा उल्हास गुप्ते यांनी घेतला आहे. आगामी निवडणुकांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका काय असेल? ते बघुया.
Ajit Pawar will be part of the BJP-Shinde alliance for the upcoming 2024 elections
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कुंडलीनुसार, “अजित पवारांची सध्या साडेसाती सुरू असल्यामुळे त्यांना सातत्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या कुंडलीत चंद्रावरून होणारे शनी भ्रमण मंगळ व प्लूटोच्या प्रतियोगातून होत आहे.
त्यामुळे उपमुख्यमंत्री सध्या भावनिक दृष्टिकोनातून निर्णय घेताना दिसत आहे. त्याचबरोबर मकर राशीत असलेल्या प्लूटोमुळे सत्तेचा कारक रवी पूर्णपणे बाधित झाला असल्याचं दिसून येत आहे.
या वर्षाच्या शेवटापासून ग्रह त्यांना अनुकूलतेचे दान टाकण्यास सुरुवात करू शकतात. तर आगामी 2024 च्या निवडणूकांसाठी अजित पवार भाजप-शिंदे युतीचाच भाग राहणार असल्याचं तरी सध्या दिसत आहे.
दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात त्यांच्या वाढदिवसाचे बॅनर लावण्यात आले आहे. या बनर्सवर त्यांचा ‘भावी मुख्यमंत्री’ त्याचबरोबर ‘जनतेच्या मनातले मुख्यमंत्री’ असा उल्लेख करण्यात आलेला आहे. या बॅनर्सनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
अजित पवार (Ajit Pawar) राज्याचे भावी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत दाखल झाले आहे.
या दौऱ्यादरम्यान ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याचे चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal | “आदित्य ठाकरे 15 वर्षांपूर्वी येवल्यात आले…”; छगन भुजबाळांनी आदित्य ठाकरेंना सुनावलं
- Sanjay Raut | “… म्हणून केंद्र सरकार मणिपूरकडे लक्ष देत नाही”; संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघात
- Eknath Shinde | इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्त मुलांचं पालकत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वीकारलं
- Eknath Shinde | राज्याच्या राजकारणात येणार नवीन भूकंप? CM शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर
- Ajit Pawar | “मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…”; ‘त्या’ ट्विटमुळं चर्चांना उधाण