Ajit Pawar | नागपूर: आज राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे. रायगड जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेनंतर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र, त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात अनेक ठिकाणी बॅनर्स झळकले आहे. तर नागपूरमध्ये दोन्ही नेत्यांचा सोबत फोटो असलेलं बॅनर दिसलं आहे. नागपूरमधील या बॅनरवरच्या मजकुरानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
This friendship should not be broken
नागपूरमध्ये अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस दोन्ही नेत्यांच्यासोबत फोटो असलेले बॅनर झळकलं आहे. या बॅनरवर ‘ही दोस्ती तुटायची नाय’ असा मजकूर लिहिलेला आहे.
या बॅनरवर अजित पवारांचा ‘राजकारणातील दादा’ तर देवेंद्र फडणवीस यांचा ‘राजकारणातील चाणक्य’ असा उल्लेख करण्यात आलेला आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांनी हे बॅनर लावले आहेत.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वाढदिवसाच्या एक जाहिरातीमध्ये शरद पवारांचा फोटो आल्यानं राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.
त्याचबरोबर या जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील फोटो झळकला आहे. या जाहिरातीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात जोरदार बॅनरबाजी होताना दिसत आहे. मुंबईमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांचा ‘भावी मुख्यमंत्री’ आणि ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ असा उल्लेख करत बॅनर्स लावण्यात आले आहे. या बॅनरबाजीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray | “… परंतु ही राजकारण्यांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे”; इर्शाळवाडी दुर्घटनेवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
- Ajit Pawar | “2024 मध्ये अजित पवार भाजप-शिवसेनेसोबत…”; अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त महत्वाची भविष्यवाणी
- Sanjay Raut | “… म्हणून केंद्र सरकार मणिपूरकडे लक्ष देत नाही”; संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघात
- Eknath Shinde | इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्त मुलांचं पालकत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वीकारलं
- Eknath Shinde | राज्याच्या राजकारणात येणार नवीन भूकंप? CM शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर