Uddhav Thackeray | “… परंतु ही राजकारण्यांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे”; इर्शाळवाडी दुर्घटनेवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

Uddhav Thackeray | रायगड: दोन दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. जिल्ह्यातील इर्शाळवाडी वस्तीवर दरड कोसळली आहे. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 22 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर 98 लोकांना वाचवण्यात यश मिळाले आहे.

या ठिकाणी अद्यापही बचावकार्य सुरूच आहे. अशात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज घटनास्थळी दाखल झाले आहे. यावेळी  त्यांनी इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांना दिलासा दिला आहे.

I am not politicizing this incident – Uddhav Thackeray

इर्शाळवाडीत दाखल झाल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना ते म्हणाले, “दरवेळी अशा प्रकारच्या दुर्घटना घडत असतात. मात्र आपण फक्त धावतो. घटनेवरून मी राजकारण करत नाही.

परंतु राजकारण्यांसाठी ही एक अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. आजही अनेक वस्त्या आहेत, ज्या डोंगर उतारावर किंवा डोंगराच्या पायथ्याशी आहे. त्या ठिकाणी कधीही दरड कोसळू शकते”

पुढे बोलताना ते (Uddhav Thackeray) म्हणाले, “या ठिकाणी जेव्हा मी दाखल झालो तेव्हा वीज नव्हती. त्यामुळे आम्ही वीज देण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारच्या नैसर्गिक दुर्घटना कधीही होऊ शकतात म्हणून आपण जबाबदारी टाळू शकत नाही.

घटना घडण्याच्या आधीच पुनर्वसन व्हायला हवं होतं. त्याचबरोबर फक्त घर देऊन पुनर्वसन होत नाही. घरासोबत त्यांना नोकरी आणि रोजगार कसा मिळेल? हे देखील पहावं लागतं.”

“कुटुंबातील सदस्य म्हणून मी तुमच्यासोबत आहे. जागा निवडताना धोका होणार नाही अशीच जागा निवडा, अशी मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो.

तुमच्या जीवाला परत धोका होता कामा नये. मी याबाबत सरकारशी बोलणार आहे. कारण आम्हाला ही वेळ परत कुणावर येऊ द्यायची नाही”, असही ते (Uddhav Thackeray) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.