🕒 1 min read
Tata Group: शेअर बाजारात कधी कोणाचं नशीब फळफळेल आणि कधी कोणाची राखरांगोळी होईल, सांगता येत नाही, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. यावेळी फटका बसलाय तो थेट टाटा ग्रुपच्या (Tata Group) गुंतवणूकदारांना! टाटांच्या एका मल्टीबॅगर शेअरमध्ये अशी काही भयानक घसरण झाली आहे की, गुंतवणूकदारांच्या डोळ्यांत पाणी आलंय.
टाटा समूहाचा भाग असलेल्या तेजस नेटवर्क्स (Tejas Networks) या कंपनीच्या शेअरने शेअर बाजारात (Stock Market) अक्षरशः लोळण घेतली आहे. कंपनीने आपल्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करताच मार्केटमध्ये खळबळ उडाली. एकेकाळी तब्बल १४५० रुपयांवर दिमाखात व्यवहार करणारा हा शेअर आता थेट ३००-३७० रुपयांच्या घरात येऊन पडला आहे.
आज बाजार बंद होताना तेजसचा शेअर ९.४८ टक्क्यांनी तुटून ३७७.६० रुपयांवर स्थिरावला. दिवसाच्या सत्रात तर या शेअरने ३६४.२५ रुपयांचा ५२ आठवड्यांचा नीचांक (52-week low) गाठला होता. वर्षभराचा उच्चांक १,१५० रुपये असताना आता शेअरची ही अवस्था पाहून गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.
नेमकं काय घडलं?
या पडझडीचं मुख्य कारण म्हणजे कंपनीची सुमार आर्थिक कामगिरी. तेजस नेटवर्क्सला २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत तब्बल १९६.५ कोटी रुपयांचा तोटा (Net Loss) झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या वर्षी याच काळात कंपनीने १६५.६७ कोटींचा नफा कमावला होता. विक्रीत झालेली मोठी घट कंपनीला भोवली आहे. तेजस नेटवर्क्स ही सरकारी कंपनी BSNL 4G नेटवर्कसाठी एक महत्त्वाची वेंडर आहे, तरीही या तोट्यामुळे शेअर होल्डर्सचं मोठं नुकसान झालं आहे.
(टीप: शेअर बाजार जोखमीचा आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)
📌 महत्वाच्या बातम्या
- “देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मालक..”; शिंदेंच्या नेत्याला सुनावताना भाजप नेत्याची जीभ घसरली!
- “महाराष्ट्रात निवडणुका, पण गाड्या परप्रांतीय?”; भाजपच्या ‘त्या’ गाड्या पाहून संताप, भाडं ऐकून डोळे फिरतील!
- “शिंदे जिगरी, अजितदादा जवळचे, पण उद्धव ठाकरे…”; फडणवीसांनी लावली मित्रांची ‘रँकिंग’, ठाकरेंबद्दल मोठं विधान!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now







