प्रतिनिधी, 14 ऑक्टोबर: भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू सूर्यकुमार यादवने देशाबाहेर एक नवीन मालमत्ता खरेदी केली आहे. त्याने थेट दुबईमध्ये समुद्रकिनारी वसलेल्या एका आलिशान इमारतीत नवे घर घेतले असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. डॅन्यूब प्रॉपर्टीजकडून त्याने हे घर खरेदी केले आहे.
खराब फॉर्ममुळे सूर्यकुमार सध्या भारतीय संघासोबतच मुंबईच्या रणजी संघातूनही बाहेर आहे. याच कारणास्तव तो मागील काही दिवसांपासून चर्चेत होता, मात्र आता त्याच्या नव्या घराची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, दुबईत ज्या ठिकाणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे, त्याच परिसरात सूर्याने घर घेतले आहे. शाहरुखच्या इमारतीच्या बांधकामाची जबाबदारीही डॅन्यूब प्रॉपर्टीजकडेच आहे.
हे नवीन घर दुबईतील ‘मॅरिटाइम सिटी’ या मध्यवर्ती आणि आलिशान भागात आहे. या प्रकल्पात ४० पेक्षा जास्त अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. यामधील ‘लॉन्जेविटी लाउंज’ या सुविधेने आपले मन जिंकल्याचे सूर्याने सांगितले. निवासी प्रकल्पांमध्ये अशी सुविधा सहसा पाहायला मिळत नाही, असे त्याचे म्हणणे आहे. या अपार्टमेंटमधील फ्लॅट्सची किंमत ५ ते १० कोटी रुपयांच्या घरात आहे.
दुबईत घर घेण्यामागील कारणही त्याने स्पष्ट केले आहे. तो म्हणाला, “येथील जीवन पूर्णपणे वेगळे आणि आलिशान आहे. सुरक्षा हीही एक महत्त्वाचा घटक आहे. अर्थात मी जिथे राहतो मुंबईत तिथे ही सुरक्षा उपलब्ध आहे. दुबईत जेव्हा मी येतो तेव्हा मला खूप आनंद होतो.”
२०१४ मध्ये आयपीएल खेळण्यासाठी आपण पहिल्यांदा दुबईत आलो होतो आणि त्यानंतर २०२० मध्ये दुसऱ्यांदा आल्याचे त्याने सांगितले. सध्या भारतातून अनेक लोक दुबईत येत असल्याचेही त्याने गुंतवणूक करण्याच्या निर्णयावर बोलताना नमूद केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- पुणे शिक्षक मतदारसंघ: महायुतीत होणार मैत्रीपूर्ण लढत, शिंदे गट सचिन सानपांच्या तर भाजप गावंडेंच्या पाठीशी
- दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची अग्रीम मदत; राज्यात आणखी ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर
- पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सचिन सानपांच्या सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी
Quick Answers
सूर्यकुमार यादवने दुबईतील 'मॅरिटाइम सिटी' या भागात 'डॅन्यूब प्रॉपर्टीज'कडून हे आलिशान घर खरेदी केले आहे.
या प्रकल्पातील 'लॉन्जेविटी लाउंज' या सुविधेने सूर्यकुमार यादवचे मन जिंकले आहे.
या अपार्टमेंटमधील फ्लॅट्सची किंमत ५ ते १० कोटी रुपयांच्या घरात आहे.
सूर्यकुमार यादव २०१४ मध्ये आयपीएल खेळण्यासाठी पहिल्यांदा दुबईत आला होता.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








