🕒 1 min read
पुणे – राजकारणात सकाळचा शपथविधी आणि दुपारची युती काही नवीन नाही, पण सध्या पुण्यात जे घडतंय ते पाहून राजकीय पंडितांनाही घाम फुटलाय! राज्यात सत्तेत सोबत असणारे पक्ष स्थानिक पातळीवर एकमेकांचे गळे पकडत आहेत, तर कट्टर विरोधक गळ्यात गळे घालत आहेत. पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये तर ‘दोन्ही राष्ट्रवादी’ पुन्हा एकत्र आल्याचं चित्र निर्माण झालंय. याच गोंधळावर आता खुद्द सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान होत आहे. राज्यात अजित पवार भाजपसोबत सत्तेत आहेत, पण पिंपरी-चिंचवडमध्ये तेच अजित पवार (Ajit Pawar) भाजपच्या विरोधात शड्डू ठोकून उभे आहेत. आणि आश्चर्य म्हणजे, इथे त्यांना साथ मिळतेय ती शरद पवार गटाची! या ‘पुणेरी पॅटर्न’मुळे मतदारांची मात्र भंबेरी उडाली आहे.
Supriya Sule Statement on NCP Reunion
यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी अत्यंत महत्त्वाचा खुलासा केला. त्या म्हणाल्या, “सध्या आम्ही फक्त पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठीच एकत्र लढत आहोत.” अजितदादांच्या ‘दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या’ विधानावर मात्र त्यांनी सावध पवित्रा घेतला. “मी अजितदादांचं ते विधान ऐकलेलं नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करणार नाही,” असं सांगत त्यांनी चेंडू टोलवला.
इतकेच नाही तर, भाजपच्या दुटप्पी भूमिकेवरही त्यांनी बोट ठेवलं. “भाजप एकीकडे अजित पवारांवर टीका करते आणि दुसरीकडे त्यांच्यासोबत सत्तेत बसते. भाजपने आधी आत्मचिंतन करावं,” असा सणसणीत टोला सुळेंनी (Supriya Sule) लगावला.
आमच्या कुटुंबात कधीच अंतर पडलं नव्हतं, मतभेद फक्त राजकीय आहेत आणि ते आजही आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. आता १६ जानेवारीला निकाल लागेल, तेव्हाच कळेल की या ‘सोयीच्या राजकारणा’चा फटका कोणाला बसतोय आणि लॉटरी कोणाला लागतेय!
📌 महत्वाच्या बातम्या
- दानवेंची जीभ घसरली; भर सभेत राणे-साटम यांचा उल्लेख करत म्हणाले, “ही पिलावळ…साटम-झाटम”
- मुंबईचं घर सोडून तेजश्री प्रधान ठाण्यात का गेली? फडणवीसांसमोर मांडली व्यथा; ‘ट्रॅफिक’वर मिळालं असं उत्तर!
- ‘पुष्पा’चा आवाज बिग बॉसच्या घरात घुमणार? मराठी इंडस्ट्रीतला ‘हा’ सुपरस्टार स्पर्धक म्हणून एन्ट्री घेणार?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










