Share

सोनू सूदने पुन्हा जिंकलं काळीज; गुजरातमधील गोशाळेसाठी दिली तब्बल २२ लाखांची देणगी

पडद्यावरच्या ‘व्हिलन’ने पुन्हा एकदा रिअल लाईफमध्ये ‘हिरो’ वाली एन्ट्री मारली आहे. सोनू सूदने गोशाळेला मोठी मदत करत सर्वांची मने जिंकली आहेत.

Published On: 

Sonu Sood Donates 22 Lakhs: गोशाळेला मदत, फोटो व्हायरल

🕒 1 min read

पडद्यावरचे हिरो खूप असतात, पण संकटाच्या काळात किंवा गरजूंच्या हाकेला जो धावून जातो, तोच खरा ‘रिअल लाईफ हिरो’ असतो. हे वाक्य पुन्हा एकदा खरं करून दाखवलंय ते बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood). कोरोना काळात हजारो लोकांचा आधारवड बनलेल्या सोनूने आता मुक्या जनावरांसाठी आपली तिजोरी उघडली आहे. गुजरातमधील एका गोशाळेला सोनूने तब्बल २२ लाख रुपयांची मदत जाहीर करत माणुसकीचं दर्शन घडवलं आहे.

सोनूने ज्या गोशाळेला मदत केली आहे, तिथे परित्यक्त आणि जखमी जनावरांचा सांभाळ केला जातो. सोनूने तिथल्या कामाचं भरभरून कौतुक केलं. तो म्हणाला, “गोशाळेचा हा प्रवास पाहून मला खूप अभिमान वाटतो. काही मोजक्या गाईंपासून सुरू झालेला हा उपक्रम आज ७००० गाईंपर्यंत पोहोचला आहे. हे केवळ माझ्यासाठीच नाही, तर प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचं आहे.”

Sonu Sood Donates 22 Lakhs To Gaushala

मदतीचा चेक तर दिलाच, पण सोनूने जेव्हा एका छोट्या वासराला प्रेमाने जवळ घेतलं, तेव्हा उपस्थितही भारावून गेले. रविवारी त्याने आपल्या X (ट्विटर) अकाउंटवर काही हृदयस्पर्शी फोटो शेअर केले. “त्या काहीही मागत नाहीत, फक्त तुमची काळजी आणि प्रेम हवं,” अशा भावना त्याने व्यक्त केल्या. सोनूच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

इथे गोसंरक्षणाचं काम ज्या पद्धतीने सुरू आहे, ते पाहून सोनू भारावून गेला. हे मॉडेल संपूर्ण भारतात राबवलं गेलं पाहिजे, अशी इच्छा व्यक्त करत “मी इथे पुन्हा पुन्हा येत राहीन,” असा शब्दही त्याने दिला. दरम्यान, कामाच्या आघाडीवर बोलायचं तर, सोनूचा ‘फतेह’ हा सिनेमा (Fateh Movie) जानेवारी २०२५ मध्ये प्रदर्शित झाला होता, ज्यातून त्याने दिग्दर्शनातही नशीब आजमावलं आहे. पण सध्या चर्चा आहे ती त्याच्या या ‘गोसेवेची’!

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)