Share

“तुम्ही ‘व्हाईट हाऊस’ बांधलं, पण शिवसैनिकांना घर नाही”; भाजप नेत्याचा मंत्री संजय शिरसाटांवर थेट हल्लाबोल!

“तुम्ही व्हाईट हाऊस बांधलं, पण शिवसैनिकांचे काय?” संजय केनेकरांनी पालकमंत्र्यांवर घणाघाती टीका करत महायुतीत खळबळ उडवून दिली आहे.

Published On: 

Sanjay Kenekar vs Sanjay Shirsat

🕒 1 min read

छत्रपती संभाजीनगर- राजकारणात नेत्याला एकदा सत्तेची खुर्ची मिळाली की, ज्यांच्या जीवावर ते मोठे झाले त्या कार्यकर्त्यांचा विसर पडतो का? असा सवाल उपस्थित करणारं एक वादळी भाषण सध्या छत्रपती संभाजीनगरात चर्चेचा विषय ठरलं आहे. भाजपचे नेते संजय केनेकर (Sanjay Kenekar) यांनी भर सभेत महायुतीतीलच मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाच्या पालकमंत्र्यांवर, अर्थात संजय शिरसाट यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. यामुळे महायुतीत चांगलीच खळबळ उडाली आहे.

Sanjay Kenekar vs Sanjay Shirsat

केनेकर यांनी आपल्या भाषणात पालकमंत्र्यांच्या संपत्तीवर आणि नेपोटिझमवर बोट ठेवलं. “ज्या शिवसेनेच्या जोरावर, ज्या शिवसैनिकांच्या खांद्यावर उभे राहून तुम्ही मोठे झालात, तिकडे मोठं ‘व्हाईट हाऊस’ (White House) झालं हो, पण इथल्या शिवसैनिकांना साधं घर नाही,” असा घणाघात केनेकरांनी केला. पदमपुऱ्याच्या मातीतल्या कार्यकर्त्यांनी तुमच्यासाठी केसेस अंगावर घेतल्या, जेल भोगलं, पण तुम्ही सत्तेत गेल्यावर त्यांना काय दिलं? असा सवाल त्यांनी विचारला.

केवळ घराचा मुद्दा नाही, तर मुला-मुलींच्या उमेदवारीवरूनही केनेकरांनी पालकमंत्र्यांना घेरलं. भाजपचा आदर्श सांगताना ते म्हणाले की, भाजपने नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारलं, पण इथे मात्र स्वतःच्या मुलाला आणि मुलीला तिकीट देण्यासाठी धडपड सुरू आहे. “तुम्ही कमळाच्या पिचवर खेळताय हे विसरू नका, तुम्ही शहराचे पालक असाल, पण महाराष्ट्राचे मालक आम्ही आहोत, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आहेत,” हे केनेकरांचं वाक्य आता महायुतीत वादाची ठिणगी टाकण्याची शक्यता आहे. शहरात २५ वर्षांपासून तुमची सत्ता असूनही, लोकांना ८-१० दिवसांतून एकदा पाणी मिळतं, यावरही त्यांनी बोट ठेवलं. “ज्या मामा चौकातून तुम्ही मोठे झालात, तिथेच तुमचं विसर्जन जनता करेल,” असा इशाराच त्यांनी दिला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)