प्रतिनिधी, 14 ऑक्टोबर: इंडोनेशियातील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक रेझा रहाडियन याच्या आगामी 'कॅस्परिना' (Casparina) या चित्रपटाला प्रतिष्ठेचा 'सीजे ईएनएम अवॉर्ड' (CJ ENM Award) जाहीर झाला आहे. हा सिनेमा त्याची आजी फ्रान्सिस्का कॅस्परिना फंगिदाय यांच्या जीवनावर आधारित असून, दिग्दर्शक म्हणून रेझाचा हा दुसरा चित्रपट आहे.
फ्रान्सिस्का या इंडोनेशियाच्या स्वातंत्र्यलढ्यातील पत्रकार आणि संसद सदस्य होत्या. १६६५ मध्ये देशात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर त्यांचे नागरिकत्व हिरावून घेत त्यांना देशाबाहेर काढण्यात आले होते. त्यानंतरची सुमारे ३६ वर्षे त्यांनी युरोपमध्ये निर्वासित म्हणून घालवली. याच राजकीय वादळामुळे फ्रान्सिस्का आणि त्यांच्या मुलांची झालेली दशकांची ताटातूट, त्यातून पिढ्यानपिढ्या वाट्याला आलेले दुःख आणि स्वतःची ओळख शोधण्याचा प्रवास यावर रेझाने ही भावनिक कौटुंबिक कथा गुंफली आहे.
या चित्रपटाची निवड करताना ज्युरींनी म्हटले आहे की, "ही केवळ एका देशाची राजकीय गोष्ट राहत नाही; यातली वेदना आणि घर तुटण्याचे दुःख हे जगभरातल्या कोणत्याही प्रेक्षकाला आतपर्यंत हलवून टाकणारे आहे…" या पुरस्कारासोबतच चित्रपटाला १०,००० अमेरिकन डॉलर्सचे (सुमारे सव्वा आठ लाख रुपये) रोख विकास अनुदान मिळाले आहे.
या सन्मानामुळे दक्षिण कोरियातील 'CJ ENM' या बलाढ्य संस्थेचे नाव या प्रकल्पाशी जोडले गेले आहे. परिणामी, चित्रपटासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर को-प्रोडक्शन, वितरण आणि जागतिक महोत्सवांचे दरवाजे आता उघडले आहेत. गेल्या वर्षी रेझाच्या 'पंकू' अर्थात 'ऑन युअर लॅप' (२०२५) या पहिल्या दिग्दर्शकीय चित्रपटाला बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चार मानाचे पुरस्कार मिळाले होते.
रेझा हा इंडोनेशियातील सर्वाधिक व्यग्र आणि महागडा कलावंत मानला जातो. पहिल्या चित्रपटानंतर दिग्दर्शक म्हणून त्याचा हा एक महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय टप्पा ठरत आहे. त्याच्या या सिनेमाला आता जागतिक व्यासपीठ आणि बाजारपेठ उपलब्ध झाल्याने, याचा थेट फायदा इंडोनेशियन सिनेसृष्टीला होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजेत; संजय राऊत यांची सडकून टीका
- मोदीजी… या आवाजासमोर उभे राहू नका; विद्यार्थ्यांच्या मारहाणीवरून राहुल गांधींचा सरकार आणि पोलिसांना मोठा इशारा
- पुण्यातील १०० नगरसेवकांना भाजपची ‘कारणे दाखवा’ नोटीस; कार्यक्रमाला दांडी मारणे भोवले
Quick Answers
रेझा रहाडियन याच्या आगामी 'कॅस्परिना' (Casparina) या चित्रपटाला प्रतिष्ठेचा 'सीजे ईएनएम अवॉर्ड' (CJ ENM Award) जाहीर झाला आहे.
हा चित्रपट रेझाची आजी फ्रान्सिस्का कॅस्परिना फंगिदाय यांच्या जीवनावर आधारित आहे. त्या इंडोनेशियाच्या स्वातंत्र्यलढ्यातील पत्रकार आणि संसद सदस्य होत्या.
या पुरस्कारासोबतच चित्रपटाला १०,००० अमेरिकन डॉलर्सचे (सुमारे सव्वा आठ लाख रुपये) रोख विकास अनुदान मिळाले आहे.
रेझाच्या 'पंकू' अर्थात 'ऑन युअर लॅप' (२०२५) या पहिल्या दिग्दर्शकीय चित्रपटाला बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चार मानाचे पुरस्कार मिळाले होते.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







