Share

रेपो रेट पुन्हा कमी होण्याची शक्यता; गृहकर्जधारकांसाठी दिलासादायक बातमी

RBI may cut the repo rate for the third time in a row. Home loan EMIs may reduce again after the June policy meet.

Published On: 

RBI may cut the repo rate for the third time in a row. Home loan EMIs may reduce again after the June policy meet.

दिल्ली – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) जून महिन्यात सलग तिसऱ्यांदा रेपो रेटमध्ये कपात करू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आरबीआयने फेब्रुवारी आणि एप्रिल 2025 मध्ये अनुक्रमे 25 बेसिस पॉईंटने रेपो रेट कमी केला होता. सध्या रेपो रेट 6.00 टक्क्यांवर आहे. 4 ते 6 जून दरम्यान पतधोरण समितीची बैठक होणार असून, अंतिम निर्णय 6 जून रोजी जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

RBI Likely to Cut Repo Rate Again in June 2025

गेल्या दोन महिन्यांत किरकोळ महागाईचा दर 4 टक्क्यांखाली आहे. एप्रिल महिन्यात तो 3.16 टक्क्यांवर पोहोचला असून, हा दर गेल्या सहा वर्षांत सर्वात नीचांकी आहे. खाद्यपदार्थांच्या किमती कमी झाल्यानं महागाईवर नियंत्रण मिळालं आहे. त्यामुळे 25 बेसिस पॉईंटनी कपात होऊन रेपो रेट 5.75 टक्क्यांवर येईल, अशी शक्यता अर्थतज्ज्ञांनी वर्तवली आहे.

नोमुराचा अंदाज – रेपो रेट 5% वर येऊ शकतो

नोमुराच्या अहवालानुसार 2025 च्या दुसऱ्या सहामाहीत महागाई 3.34 टक्क्यांवर राहू शकते. त्याचबरोबर RBI 2025-26 मध्ये अजून 5 वेळा पतधोरण जाहीर करणार आहे. त्यामुळे भविष्यात रेपो रेट 5 टक्क्यांवर येऊ शकतो, असा अंदाज आहे.

गृहकर्ज आणि वाहनकर्जधारकांना दिलासा

रेपो रेटमध्ये कपात झाली, तर बँका गृहकर्ज व वाहन कर्जावरील व्याजदरात कपात करतात. यामुळे नवीन कर्ज घेणाऱ्यांना तसेच रेपो रेटशी संलग्न व्याजदर असणाऱ्यांना दिलासा मिळतो. RBI च्या धोरणाचा कल सध्या विकासाला प्राधान्य देण्याकडे असून, यावेळी देखील असाच निर्णय होण्याची शक्यता आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही