🕒 1 min read
मुंबई – राजकारणाच्या आखाड्यात कधी कोण कोणाची बाजू घेईल आणि कोणाच्या गळ्यात कोणता झेंडा दिसेल, हे ब्रह्मदेवालाही सांगता येणार नाही, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असतानाच, रविवारी वांद्र्याच्या (BMC Election 2026) रस्त्यावर जे दृश्य दिसलं, त्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ९० च्या दशकात तरुणांच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) थेट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या प्रचारासाठी मैदानात उतरली आहे!
प्रचाराचा शेवटचा रविवार असल्याने मुंबईतील सर्वच पक्ष ताकदीने रस्त्यावर उतरले होते. वांद्रे (पश्चिम) येथील प्रभाग क्र. १०१ मध्ये ठाकरे गटाच्या उमेदवार अक्षता मेनझेस यांच्या प्रचार रॅलीत रवीना टंडन मुख्य आकर्षण ठरली. विशेष म्हणजे, रवीनाच्या गळ्यात शिवसेनेचा ‘मशाल’ चिन्हाचा गमछा पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. चिंबई ते कांतवाडी परिसरात निघालेल्या या रोड शोमध्ये रवीनाला पाहण्यासाठी अलोट गर्दी लोटली होती.
Raveena Tandon Campaign for shivsena
ही केवळ ग्लॅमरस हजेरी नव्हती, तर रवीनाने यावेळी थेट उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) कामाची स्तुती केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना ती म्हणाली, “महाराष्ट्राची संस्कृती टिकवण्यासाठी जे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत, त्यांना साथ देणं माझं कर्तव्य आहे. संकटकाळात ज्या पद्धतीने काम झालं, ते खरोखरच कौतुकास्पद आहे.” तिचं हे विधान कोरोना काळातील कामाकडे बोट दाखवणारं असल्याचं बोललं जातंय.
रवीना टंडन ही सहसा कोणत्याही राजकीय पक्षाचा थेट प्रचार करताना दिसत नाही. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर तिने ठाकरे गटाच्या (Shiv Sena UBT) उमेदवारासाठी मते मागितल्याने हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सुसाट व्हायरल होत आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून त्याआधीच रवीनाने केलेली ही ‘बॅटिंग’ मतदारांवर किती प्रभाव टाकते, हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल.
📌 महत्वाच्या बातम्या
- “तुम्ही ‘व्हाईट हाऊस’ बांधलं, पण शिवसैनिकांना घर नाही”; भाजप नेत्याचा मंत्री संजय शिरसाटांवर थेट हल्लाबोल!
- बाळासाहेबांच्या सभेला झाडावर लटकणारी गर्दी ते शिंदेंच्या सभेला ‘नाव न माहित’ असलेले लोक; शिवतीर्थाने काय काय पाहिलं!
- “मुंबईत ‘गरबा’ नव्हे, ढोल-ताशाच वाजणार!”; राज ठाकरेंचा अदानींना थेट इशारा, ‘त्या’ एन्काऊंटरवरही संशय!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










