पुढच्या २-५ महिन्यांत देशात मोठी गडबड होईल, देशाला पंतप्रधान नसेल: राज ठाकरेंचे मोठे भाकीत

येत्या २-५ महिन्यांत देशात मोठी गडबड होईल आणि काही काळासाठी देशाला पंतप्रधान नसेल, असे राजकीय भाकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले आहे.

Published On: 

Maharashtra does not need reservation MNS raj thackeray statment

प्रतिनिधी, 22 ऑक्टोबर: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देशाच्या राजकीय परिस्थितीवर मोठे भाकीत केले आहे. येत्या दोन ते पाच महिन्यांत देशात काहीतरी मोठी गडबड होईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. खासदार संजय राऊत यांनी ‘रेजीम चेंज’ (सत्तांतर) बाबत केलेल्या वक्तव्याला दुजोरा देत, यासंदर्भात आपले राऊतांशी बोलणे झाल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच, पुढे असा एक छोटा काळ येईल, जिथे देशाला पंतप्रधानच नसेल, असेही ते म्हणाले.

एपस्टिनसोबतचा फोटो समोर आला असून, अशा अजून अनेक गोष्टी बाहेर येतील आणि हे थांबणार नाही, असा दावा राज ठाकरे यांनी केला. सरकारकडून चुकांवर चुका होत राहतील. त्यामुळे आगामी काही वर्षांत संपूर्ण देश रस्त्यावर उतरल्यास मला अजिबात नवल वाटणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

नीट (NEET) परीक्षेच्या मुद्द्यावरून झालेल्या आंदोलनाचा संदर्भ देत ते म्हणाले की, या आंदोलनात रस्त्यावर आलेली मुले केवळ नीटसाठी बाहेर पडली नव्हती. लोकांच्या मनात कुठला ना कुठला राग आहे, तो व्यक्त करण्यासाठी ती बाहेर आली होती. राज्यात सध्या दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, आगामी काळात उद्भवणारी अन्नधान्याची टंचाई आणि इतर परिस्थिती हाताळणे सरकारला झेपणार नाही, अशी टीका त्यांनी केली.

आंदोलक विद्यार्थ्यांची बाजू घेत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सरकारवर संताप व्यक्त केला. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मुलांनी काहीही केले नसताना त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. या आंदोलनात अराजकता कुठे होती, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ‘भाजप जुने दिवस विसरले काय? पुढच्या वेळेस त्यांचे छायाचित्र लावा’, असा टोलाही त्यांनी लगावला.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भाकितानुसार, येत्या दोन ते पाच महिन्यांत देशात काहीतरी मोठी गडबड होईल आणि पुढे असा एक छोटा काळ येईल जेव्हा देशाला पंतप्रधानच नसेल.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही