Share

बाल लैंगिक शोषण प्रकरणात पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची शिक्षा; आंतरराष्ट्रीय टोळीचा होता म्होरक्या

बाल लैंगिक शोषण करणाऱ्या ऑनलाईन टोळीचा सूत्रधार असलेल्या पुण्याच्या रोहन राणेला फ्रान्समधील न्यायालयाने २० वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

Published On: 

Pune youth sentenced to 20 years in France for child abuse

प्रतिनिधी, 12 ऑक्टोबर: शिक्षणासाठी पुण्यातून फ्रान्समध्ये गेलेल्या एका २९ वर्षीय तरुणाला स्थानिक न्यायालयाने २० वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली आहे. रोहन राणे असे या तरुणाचे नाव असून, तो आंतरराष्ट्रीय स्तरावर बाल लैंगिक शोषण आणि छळ करणाऱ्या एका ऑनलाईन टोळीचा मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात उघड झाले आहे.

रोहन उच्च शिक्षणासाठी फ्रान्समध्ये वास्तव्यास होता. यादरम्यान त्याने ‘डिस्कॉर्ड’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा गैरवापर करून जगभरातील अल्पवयीन मुलांना आपल्या जाळ्यात ओढले. ‘सीव्हीएलटी’ (CVLT) नावाच्या एका गुन्हेगारी ऑनलाईन गटाच्या माध्यमातून तो या मुलांवर दबाव टाकत असे. या मुलांना विविध टास्क देऊन त्यांच्याकडून हिंसक आणि लैंगिक स्वरूपाचे व्हिडिओ बनवून घेण्याचे गंभीर कृत्य ही टोळी करत होती.

या आंतरराष्ट्रीय रॅकेटची माहिती अमेरिकन गुप्तचर यंत्रणांना सर्वप्रथम मिळाली होती. त्यांनी हे गोपनीय इनपूट फ्रान्सच्या पोलिसांना दिले. याच माहितीच्या आधारे फ्रान्स पोलिसांनी २०२१ मध्ये आंतिब शहरातून रोहनला अटक केली. या रॅकेटमध्ये भारत, अमेरिका, जर्मनी आणि न्यूझीलंडमधील काही तरुणांचाही सहभाग असल्याचे तपासात समोर आले असून, टोळीतील अन्य सदस्यांना अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे भारतीय सुरक्षा यंत्रणांनाही धक्का बसला आहे.

या गुन्हेगारी प्रकरणात जगभरातील २० हून अधिक पीडित मुलांची ओळख पटवण्यात आली आहे. त्यापैकी सज्ञान झालेल्या ६ जणांनी न्यायालयात प्रत्यक्ष साक्ष दिली. खटल्यादरम्यान भक्कम डिजिटल पुराव्यांच्या आधारे सरकारी वकिलांनी रोहनला ३० वर्षे शिक्षा देण्याची मागणी केली होती. सुनावणीअंती न्यायालयाने फ्रान्समधील कायद्यानुसार या गंभीर गुन्ह्यासाठी त्याला २० वर्षांची कमाल शिक्षा ठोठावली.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही