Share

Manoj Jarange यांच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल; देवेंद्र फडणवीसांनी काल दिले होते कारवाईचे संकेत

Manoj Jarange | मराठा आरक्षणासाठी विनापरवाना रास्तारोको आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांकडून जरांगे यांच्यावर गुन्हा नोंद केलाय. । beed And Amalner Police Fir Against Manoj Jarange Patil For Rasta Roko Protesting Without Police Permission Maratha Reservation Agitation

Published On: 

🕒 1 min read

Manoj Jarange | सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्यावर बीडच्या शिरूर आणि अमनेरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

मनोज जरांगे पाटील यांनी गावोगावी रास्ता रोको करण्याचे आवाहन मराठा बांधवांना केले होते. त्यानंतर मराठा समाजाने विना परवानगी रास्ता रोको केल्याप्रकरणी मराठवाड्यात १०४१ जणांवर तर बीड जिल्ह्यात ४२५ जणांवर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

तसेच विना परवानगी रास्ता रोको करून वाहतुकीला अडथळा केल्याप्रकरणी मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सरकारकडून सुरू करण्यात आली आहे.

Police Fir Against Manoj Jarange Patil

दरम्यान, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगेंवर पोलीस कारवाईचे संकेत काल पत्रकार परिषदेत दिले होते. ते म्हणाले होते की, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन लागेल ते सर्व करेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आमची आहे. संयम पाळावा, कुणीही कायदा हातात घेऊ नये. मनोज जरांगे यांना कोणाचंही ऐकू नये, राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडेल असं कोणतंही कृत्य करू नये. सरकारने संयम ठेवलेला आहे अंत पाहू नका, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!