प्रतिनिधी, 5 ऑक्टोबर: भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता असून, त्यांचा पासपोर्ट जप्त करण्याची मोठी मागणी राणे यांनी केली आहे. यासोबतच त्यांनी रोहित पवार आणि ठाकरे बंधूंवरही विविध मुद्द्यांवरून थेट निशाणा साधला.
आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करताना नितेश राणे यांनी दावा केला की, दिशा सालियन प्रकरणात आदित्य यांचे नाव तब्बल १३ वेळा एफआयआरमध्ये आले आहे. त्यामुळे ते देशाबाहेर पळून जाण्याच्या तयारीत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचा पासपोर्ट तत्काळ जप्त करून त्यांच्याविरोधात ‘लुकआऊट नोटीस’ जारी करण्यात यावी, अशी मागणी राणे यांनी केली आहे.
ठाकरे बंधूंनी काढलेल्या मोर्चाचा संदर्भ देत राणे यांनी स्पष्ट केले की, लोकशाहीत मोर्चा काढण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, मात्र त्यासाठी रीतसर परवानगी घेणे आवश्यक असते. या मोर्चाला कोणतीही परवानगी नसल्याने संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणारच, असा इशारा त्यांनी दिला.
निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यावरही राणे यांनी कडाडून टीका केली. देशात चर्चेत असलेल्या ‘व्होट जिहाद’ आणि ‘गजवा-ए-हिंद’ या संकल्पनांवर भाष्य करताना, भारतात अराजकता निर्माण करण्याचा हा थेट पाकिस्तानचा अजेंडा असल्याचे स्पष्ट मत राणे यांनी मांडले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- वयाच्या १५ व्या वर्षी विक्रम रचणाऱ्या वैभवला संघातून का वगळलं जातं? गौतम गंभीरने दिले स्पष्टीकरण
- मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी
- ६ ऑक्टोबरला एकाच वेळी २ भारतीय संघ मैदानात! वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध रंगणार सामने
Quick Answers
दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता व्यक्त करत, त्यांचा पासपोर्ट तत्काळ जप्त करून त्यांच्याविरोधात ‘लुकआऊट नोटीस’ जारी करण्यात यावी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.
नितेश राणे यांच्या दाव्यानुसार, दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव तब्बल १३ वेळा एफआयआरमध्ये आले आहे आणि त्यामुळे ते देशाबाहेर पळून जाण्याच्या तयारीत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.
मोर्चा काढण्यासाठी रीतसर परवानगी आवश्यक असते, परंतु ठाकरे बंधूंच्या या मोर्चाला कोणतीही परवानगी नसल्याने संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणारच, असा इशारा राणे यांनी दिला.
या संकल्पनांवर भाष्य करताना नितेश राणे यांनी, भारतात अराजकता निर्माण करण्याचा हा थेट पाकिस्तानचा अजेंडा असल्याचे स्पष्ट मत मांडले आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








