🕒 1 min read
नाशिक– कायद्याचे रक्षकच जेव्हा भक्षक बनतात, तेव्हा सर्वसामान्यांनी कोणाकडे पाहायचं? असाच एक संतापजनक प्रकार नाशिकमधून समोर आलाय. चक्क अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी खाकी वर्दीतील (Nashik Police ) दोन अधिकाऱ्यांनीच ‘दोन लाख रुपयांची’ मागणी केली आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा (ACB Nashik) ससेमिरा लागताच हे दोन्ही बहाद्दर पोलीस ठाण्यातून पसार झाले. या घटनेमुळे नाशिकच्या पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
Nashik Police Bribe Case
नेमकं प्रकरण काय?
मुंबईनाका पोलीस ठाण्यातील (Mumbai Naka Police Station) दोन उपनिरीक्षकांवर (PSI) लाचखोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. दत्तात्रय गोडे आणि अतुल क्षीरसागर अशी या संशयित अधिकाऱ्यांची नावे आहेत. एका फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी त्यांनी तक्रारदार कंत्राटदाराकडे तब्बल दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. पण कंत्राटदाराने लाच देण्यास नकार देत थेट एसीबीकडे धाव घेतली आणि या दोघांचं पितळ उघडं पडलं.
या भ्रष्टाचारासाठी त्यांनी थेट शासकीय विश्रामगृहाच्या (Govt Rest House) उपहारगृहाचा वापर केला. उपहारगृह चालक रमेश आहिरे आणि त्याचा मुलगा कल्पेश आहिरे यांनी यात मध्यस्थी केली. एसीबीने शनिवारी रात्री सापळा रचला आणि कल्पेशला दोन लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले. चौकशीत त्याने हे पैसे ‘साहेब लोकांसाठी’च घेतल्याची कबुली दिली.
फौजदार नॉट रिचेबल: लाच स्वीकारल्याचं कळताच आणि गुन्हा दाखल होताच दत्तात्रय गोडे (PSI Dattatray Gode) आणि अतुल क्षीरसागर हे दोन्ही फौजदार शहरातून पसार झाले आहेत. त्यांचा शोध सुरू असून लवकरच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात अतुल क्षीरसागर हाच ‘मास्टरमाइंड’ असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. ज्या पोलीस ठाण्यात ते रुबाब करायचे, तिथेच त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने नाशिककरांमधून संताप व्यक्त होत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “अदानी नको, पण ‘मुलतानी-ममदानी’ चालतात का?”; राज ठाकरेंच्या व्हिडीओनंतर नितेश राणेंचा खळबळजनक वार!
- Zilla Parishad Election: राजकीय भूकंप टळला? जिल्हा परिषद निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; नवी ‘डेडलाईन’ आली समोर!
- Ind vs NZ: वडोदऱ्यात कोहलीनं हार्टबीट वाढवले; शतक हुकलं तरी भारताची ‘विराट’ विजयपताका!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now







