🕒 1 min read
मुंबई – वर्दीचं स्वप्न पाहणाऱ्या किंवा ‘साहेबांच्या’ खुर्चीवर बसण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांची वयोमर्यादा संपली होती का? स्वप्न भंगल्याच्या निराशेत तुम्ही होतात का? जर तुमचं उत्तर ‘हो’ असेल, तर आता तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) लाखो उमेदवारांच्या डोळ्यांतलं पाणी पुसणारा एक मोठा निर्णय घेतला आहे. आयोगाने गट-ब आणि गट-क संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ साठी पात्र उमेदवारांना एक वर्षाची वयोमर्यादा शिथिल करण्याचा दिलासादायक निर्णय जाहीर केला आहे.
MPSC Age Limit Relaxation
गेल्या काही वर्षांत कधी कोरोना तर कधी प्रशासकीय गोंधळामुळे परीक्षा रखडल्या. यात अनेक होतकरू तरुणांचं वय निघून गेलं. विद्यार्थी संघटना आणि उमेदवार सातत्याने सरकारकडे यावर तोडगा काढण्याची मागणी करत होते. अखेर आयोगाने उमेदवारांचं म्हणणं मनावर घेतलं आणि ही ‘एक वेळची विशेष सवलत’ (One-time relaxation) जाहीर केली. त्यामुळे वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना आता पुन्हा एकदा नशीब आजमवता येणार आहे.
MPSC Exam अर्ज कधीपर्यंत करायचा?
आनंदाच्या भरात तारीख विसरू नका! आयोगाने अर्ज करण्याची मुदत वाढवून आता ६ जानेवारी केली आहे. त्यामुळे ज्यांना कागदपत्रं जमवायची आहेत, त्यांना थोडा जास्तीचा वेळ मिळालाय.
केंद्रांबाबत ‘हा’ नियम लक्षात ठेवा
नव्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा केंद्रांबाबत चॉईस लिमिटेड आहे. त्यांना फक्त अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे याच केंद्रांवर परीक्षा देता येईल. त्यामुळे अर्ज भरताना घाईगडबड न करता केंद्राची निवड काळजीपूर्वक करा. ही संधी कदाचित शेवटची असू शकते, त्यामुळे आता जोमाने अभ्यासाला लागा!
📌 महत्वाच्या बातम्या
- वेगवेगळ्या शोकसभा अन् ‘ते’ तर्क-वितर्क; धर्मेंद्र यांच्या निधनानंतर देओल कुटुंबात दुफळी? हेमा मालिनींनी सोडलं मौन!
- “भाजपने २० वर्षांच्या निष्ठेची ‘ती’ परतफेड केली…”; डोंबिवलीच्या इन्फ्लुएन्सरचा संताप, अखेर राज ठाकरेंनी दिला आधार!
- “नार्वेकरांनी ‘मवाली’सारखी दमदाटी केली, त्यांच्यावर गुन्हा दाखल कराच!”; काँग्रेसचा एल्गार, राष्ट्रपतींकडेही केली मोठी मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










