Share

Ladki Bahin Yojana: ₹२१०० मिळणार? PM-EAC अहवालात मोठी शिफारस

PM मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेने ‘लाडकी बहीण’ योजनेतील आर्थिक मदत महागाईनुसार वाढवण्याची शिफारस करण्यात आली आहे. मात्र राज्य सरकारने अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही.

Published On: 

Ladki Bahin Yojana

मुंबई : महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीने (Mahayuti Government) या योजनेतील मासिक आर्थिक मदत ₹१,५०० वरून ₹२,१०० करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतर याबाबत अधिकृत निर्णय जाहीर झालेला नसल्याने लाभार्थी महिलांमध्ये उत्सुकता कायम आहे.

निवडणूक आश्वासनावर पुन्हा चर्चा

निवडणुकीनंतर विरोधकांकडून सातत्याने सरकारला ₹२,१०० रुपयांच्या आश्वासनाची आठवण करून दिली जात आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेकदा आरोप-प्रत्यारोपही झाले. अद्याप राज्य सरकारने रक्कम वाढवण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नसली, तरी आता केंद्र स्तरावरील एका अहवालामुळे या चर्चेला नवे वळण मिळाले आहे.

PM मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालात महत्त्वाची शिफारस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार परिषद (EAC-PM) ने महिलांसाठी राबवल्या जाणाऱ्या राज्यातील योजनांचा अभ्यास करून एक शोधनिबंध सादर केला आहे. या अभ्यासात महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आणि ओडिशातील ‘सुभद्रा योजना’ यांचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे.

अहवालात नमूद करण्यात आले आहे की, महागाई आणि कुटुंबांच्या वाढत्या खर्चाचा विचार करून आवश्यक वाटल्यास अशा योजनांमधील रोख आर्थिक सहाय्य वाढवण्याचा विचार सरकारने करावा, अशी शिफारस करण्यात आली आहे.

महिलांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्याचा दावा

अहवालानुसार, लाडकी बहीण आणि सुभद्रा या दोन्ही योजनांमुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या मोठा आधार मिळाला आहे. महिलांच्या बचतीत वाढ झाली, घरगुती खर्च भागविण्यास मदत झाली आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारल्याचा दावा या अभ्यासात करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात बचत आणि खर्च दोन्ही वाढले

अभ्यासानुसार, लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातील महिलांच्या बँक खात्यांतील शिल्लक रकमेतील सरासरी वाढ सुमारे ८४ टक्के झाली आहे. त्याचबरोबर महिलांच्या मासिक खर्चात सुमारे ४६ टक्के वाढ झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे. आरोग्य, शिक्षण आणि दैनंदिन गरजांवर हा खर्च होत असल्याने महिलांच्या जीवनमानात सकारात्मक बदल झाल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.

८० लाख महिला अपात्र ठरल्याची चर्चा

दरम्यान, राज्य सरकारने योजनेसाठी लाभार्थींना KYC पूर्ण करण्याचे आवाहन केले होते आणि त्यासाठी अनेकदा मुदतवाढही दिली होती. मात्र, KYC प्रक्रियेदरम्यान झालेल्या त्रुटी किंवा पात्रतेच्या निकषांमुळे सुमारे ८० लाख महिला अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे अनेक लाभार्थींमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अधिकृत निर्णयाची प्रतीक्षा

PM-EAC च्या अहवालात आर्थिक सहाय्य वाढवण्याची शिफारस करण्यात आली असली, तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम ₹१,५०० वरून ₹२,१०० करण्यात आली आहे, अशी कोणतीही अधिकृत घोषणा राज्य सरकारने अद्याप केलेली नाही. त्यामुळे लाभार्थींनी अधिकृत निर्णयाची प्रतीक्षा करणे आवश्यक आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही