Share

लाडक्या बहिणींसाठी मोठी ‘न्यूज’; ३००० रुपये खात्यात येणार की नाही? निवडणूक आयोगाने स्पष्टच सांगितलं!

लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्यावरून संभ्रम दूर. निवडणूक आयोगाने ॲडव्हान्स पेमेंटला दिला नकार, पण डिसेंबरचे पैसे मिळणार. वाचा सविस्तर.

Published On: 

Ladki Bahin Yojana Payment

🕒 1 min read

मुंबई – राजकारणात अफवांना पंख असतात आणि निवडणुकीच्या काळात तर ते अधिकच वेगाने पसरतात, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. मकर संक्रांतीचा मुहूर्त साधत लाडक्या बहिणींच्या (Ladki Bahin Yojana) खात्यात ‘डबल धमाका’ होणार, अशा चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, आता State Election Commission (राज्य निवडणूक आयोग) ने या उत्साहावर मोठं ‘ब्रेक’ लावलं आहे. आयोगाने लाडक्या बहिणींच्या पैशांबद्दल महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली असून, त्यामुळे काहींना दिलासा तर काहींचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.

Ladki Bahin Yojana Payment Update

झाले असे की, डिसेंबर आणि जानेवारीचे मिळून ३००० रुपये १४ जानेवारीपूर्वीच, म्हणजे मकर संक्रांतीला बहिणींच्या खात्यात जमा होणार असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. भाजप नेते गिरीश महाजन आणि उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे या चर्चांना बळ मिळालं होतं. पण काँग्रेसने यावर जोरदार आक्षेप घेतला. “मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे टाकणे हे मतदारांना प्रलोभन दाखवण्यासारखे आहे,” अशी तक्रार काँग्रेसने आयोगाकडे केली होती. या Complaint ची आयोगाने गंभीर दखल घेतली.

मुख्य सचिवांनी सादर केलेल्या अहवालानंतर आयोगाने (Election Commission) ‘दुध का दुध, पानी का पानी’ केलं आहे. आयोगाच्या निर्देशानुसार, आचारसंहिता लागण्यापूर्वी सुरू असलेल्या योजनांचे नियमित हप्ते देता येतात. त्यामुळे डिसेंबरचे १५०० रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, जानेवारी महिन्याचा हप्ता ‘ॲडव्हान्स’मध्ये (Advance Payment) देण्यास आयोगाने सक्त ‘रेड सिग्नल’ दाखवला आहे.

थोडक्यात काय, तर लाडक्या बहिणींना (Ladki Bahin Yojana) डिसेंबरचे पैसे नक्की मिळतील, पण जानेवारीच्या पैशांसाठी मात्र प्रतीक्षा करावी लागेल. तसेच, आचारसंहिता काळात नवीन लाभार्थी नोंदणी करता येणार नाही, हे सुद्धा आयोगाने स्पष्ट केलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)