दुष्काळात शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू, तर जालन्यात भाजप नेत्यावर भजनात नोटांची उधळण!

जालन्यातील भजनाच्या कार्यक्रमात भाजपचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यावर नोटांची उधळण. दुष्काळी परिस्थितीत नेत्याचा डान्स पाहून सर्वत्र संताप व्यक्त.

Published On: 

MHD LOGO

जालना, 14 ऑक्टोबर: एका बाजूला संपूर्ण महाराष्ट्र भीषण दुष्काळाचा सामना करत असून शेतकरी हवालदिल झाला आहे, तर दुसऱ्या बाजूला जालन्यात भाजपच्या एका नेत्यावर चक्क नोटांची उधळण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यावर एका भजन कार्यक्रमात पैशांचा पाऊस पाडण्यात आला.

काल रात्री जालना शहरातील मंमादेवी मंदिर परिसरात हा भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याठिकाणी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर भाजप नेते कैलास गोरंट्याल यांनी 'मै हुँ डॉन' या गाण्यावर ठेका धरला. याच वेळी त्यांच्यावर नोटा उधळण्यात आल्या. पावसाअभावी शेतकऱ्यांची उभी पिके जळून खाक झाली असताना आणि जालन्यासारख्या दुष्काळग्रस्त भागातच हा प्रकार घडल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

या घटनेवर टीका होऊ लागल्यानंतर गोरंट्याल यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. भजनाच्या अगोदर आपण शेतकऱ्यांसाठी देवाकडे प्रार्थना केली होती, असे ते म्हणाले. "भजनामध्ये माणूस मंत्रमुग्ध होतो, तेव्हा कोण काय करतो हे माहीत होत नाही. आरतीच्या निमित्ताने गेलो असता कार्यकर्त्यांच्या आग्रहानुसार करावे लागते," असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. आपण पुढाऱ्यासारखे वागल्यास कार्यकर्ते सोबत येत नाहीत, त्यामुळे त्यांच्यासारखेच वागावे लागते, असे सांगत त्यांनी आपली कार्यकर्त्यांना सांभाळण्याची पद्धत वेगळी असल्याचे नमूद केले. तसेच, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आपले सरकार आणि आपण प्रामाणिकपणे कटिबद्ध असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

राज्यात यापूर्वी ३५८ पैकी ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. त्यात आज राज्य सरकारने आणखी ४० तालुक्यांची भर घातली आहे. डोळ्यादेखत पिके करपल्याने अनेक शेतकऱ्यांवर रोटावेटर फिरवण्याची वेळ आली असून त्यांच्या डोळ्यांत अश्रू आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दिवाळीपूर्वी तातडीची मदत म्हणून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपये जमा करण्याची घोषणा केली आहे. उर्वरित मदत नंतर दिली जाणार आहे. तसेच चारा आणि पाण्याची योग्य व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

भाजप नेते आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यावर एका भजन कार्यक्रमात नोटांची उधळण करण्यात आली.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही