Share

Job Opportunity | तरुणांनो लक्ष द्या! राज्य शासनाच्या ‘या’ विभागात रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य क्षयरोग नियंत्रण संस्था (National Tuberculosis Institute), मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आणि विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी उमेदवार आजपासूनच … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य क्षयरोग नियंत्रण संस्था (National Tuberculosis Institute), मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आणि विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र शासनाच्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) एकूण 42 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, टीबी आरोग्य अभ्यागत, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, पीपीएम समन्वयक, समुपदेशक आणि सांख्यिकी सहाय्यक पदाच्या जागा आहेत.

राज्य क्षयरोग नियंत्रण संस्था यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर तपशीलांबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात किंवा खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

या भरती प्रक्रियेसाठी (Job Opportunity) इच्छुक उमेदवार 24 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अधिकृत वेबसाइट

http://arogya.maharashtra.gov.in/Site/Form/NewsAndEventDetails.aspx?ID=101822

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/1Klfet-oqOXjy7G8up3hwdSt1bbSKFgTI/view

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही