Belpatra Leaves | बेलाच्या पानांचा रस प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Belpatra Leaves | टीम कृषीनामा: बेलपत्राचा उपयोग भगवान शंकराच्या पूजेसाठी केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का? बेलपत्र आपल्या शरीरासाठी देखील खूप फायदेशीर आहे. बेल पत्राचे सेवन केल्याने शरीरातील अनेक समस्या सहज दूर होतात. कारण यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. बेलपत्राचे सेवन केल्याने शरीर दीर्घकाळ निरोगी राहण्यास सोबतच शरीरातील अनेक आजार दूर होतात. त्याचबरोबर बेलाच्या पानांचा रस अनेक गंभीर समस्यांसाठी एक रामबाण उपाय ठरू शकतो. बेल पानांच्या रसाचे सेवन केल्याने आरोग्याला पुढील फायदे मिळू शकतात.

अशक्तपणा दूर होतो (The weakness is removed-Belpatra Leaves Juice)

शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी बेल पानांचा रस फायदेशीर ठरू शकतो. ज्या लोकांना रक्ताची कमतरता किंवा अशक्तपणाची तक्रार आहे त्यांनी बेल पानाच्या रसाचे सेवन नक्की केले पाहिजे. या रसाचे सेवन केल्याने शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते. यासाठी तुम्हाला एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा बेल पानाचा रस मिसळून त्याचे सेवन करावे लागेल.

डायबिटीससाठी फायदेशीर (Beneficial for diabetes-Belpatra Leaves Juice)

बेल पानाचा रस डायबिटीसच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण बेल पानाच्या रसाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. त्याचबरोबर बेल पानाचा रस इन्सुलिनच्या उत्पादनास प्रोत्साहन देतो. डायबिटीसच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बेल पानाचे रसाचे सेवन करू नये.

पचनसंस्था निरोगी राहते (Digestive system remains healthy-Belpatra Leaves Juice)

बेल पानाचा रस प्यायल्याने पचन संस्था निरोगी राहू शकते. बेल पानाचा रस आतड्यांमधून विषारी पदार्थ बाहेर टाकून पोट साफ करण्यास मदत करतो. पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी तुम्हाला बेल पानाच्या रसामध्ये मीठ आणि काळी मिरी मिसळून त्याचे सेवन करावे लागेल.

आरोग्यासाठी बेल पानाचा रस खूप फायदेशीर आहे. त्याचबरोबर बेल पानाचे सेवन केल्याने आरोग्याला पुढील फायदे मिळू शकतात.

तापासाठी फायदेशीर (Beneficial for fever-Belpatra Leaves Benefits)

तापाच्या समस्येवर बेलपत्राची पाने एक उत्तम पर्याय ठरू शकतो. ताप आल्यावर तुम्ही बेलपत्राच्या पाण्याचे सेवन करू शकतात. यासाठी तुम्हाला बेलाची 3 ते 4 पाने पाण्यात उकळून घ्यावी लागेल. त्यानंतर पाण्याचा रंग बदलेपर्यंत तुम्हाला हे पाणी उकळून घ्यावे लागेल. हे पाणी कोमट झाल्यावर तुम्ही त्याचे सेवन करू शकतात. या पाण्याचे सेवन केल्याने ताप कमी होऊ शकतो.

रक्त शुद्ध राहते (The blood remains pure-Belpatra Leaves Benefits)

बेलपत्र खाल्ल्याने रक्त शुद्ध होऊ शकते. यासाठी तुम्हाला बेलाच्या पानांचा रस काढून त्यामध्ये कोमट पाणी आणि थोडासा मध मिसळून मिश्रण तयार करून घ्यावे लागेल. या पेयाचे नियमित सेवन केल्याने रक्त शुद्ध होऊ शकते. त्याचबरोबर शरीर निरोगी राहू शकते.

शरीर थंड राहते (The body remains cool-Belpatra Leaves Benefits)

बेलपत्राचे सेवन केल्याने शरीर थंड राहू शकते. त्याचबरोबर याच्या नियमित सेवनाने तोंड येणे, जळजळ यासारख्या समस्या देखील कमी होऊ शकतात. बेलपत्राचे सेवन केल्याने शरीरातून थंड राहते. उन्हाळ्यामध्ये याचे सेवन करून उष्मघाताचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Mayonnaise Side Effects | मेयोनेजचे अति प्रमाणात सेवन केल्याने आरोग्याला भोगावे लागू शकतात ‘हे’ तोटे

Papaya Benefits | फक्त पोटासाठीच नाही तर त्वचेसाठी देखील खूप फायेशीर आहे पपई, जाणून घ्या सविस्तर

Milk and Turmeric | चेहऱ्याची नैसर्गिक पद्धतीने काळजी घेण्यासाठी दूध आणि हळदीचा ‘या’ प्रकारे करा वापर

Breast Pain | महिलांनो लक्ष द्या! ब्रेस्ट पेन होत असेल तर करा ‘हे’ घरगुती उपाय

Belpatra Leaves | बेलपत्राचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे