Share

Job Vacancies | ग्रॅज्युएट उमेदवारांना संधी! महाराष्ट्र कर्मचारी राज्य विभागात ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Vacancies | टीम महाराष्ट्र देशा: ग्रॅज्युएशन पूर्ण करून नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांचा रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून विहित पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Vacancies) वैद्यकीय अधिकारी पदाच्या 49 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Vacancies) शैक्षणिक पात्रता आणि इतर तपशिलांबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात किंवा खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेतील मुलाखतीसाठी इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर 22 आणि 23 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 दरम्यान उपस्थित राहावे लागणार आहेत.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)

या भरती प्रक्रियेतील (Job Vacancies) मुलाखतीसाठी इच्छुक उमेदवारांना 20 फेब्रुवारी 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावे लागणार आहे. उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

मुलाखत आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address for sending interview and application)

वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, स. नं. ६८९/९०, पंचदीप भवन, तळमजला, बिबवेवाडी, पुणे 411037

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/13XrttQcifmUv8o_RU34d7ljDM7fa5u6U/view

अधिकृत वेबसाइट

https://www.esic.gov.in/

महत्वाच्या बातम्या

Job Vacancies | टीम महाराष्ट्र देशा: ग्रॅज्युएशन पूर्ण करून नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा …

पुढे वाचा

Job Education

Join WhatsApp

Join Now