Mayonnaise Side Effects | मेयोनेजचे अति प्रमाणात सेवन केल्याने आरोग्याला भोगावे लागू शकतात ‘हे’ तोटे

Mayonnaise Side Effects | टीम कृषीनामा: लहान मुले असो किंवा प्रौढ मेयोनेज खायला सर्वांनाच आवडते. पिझ्झा, बर्गर, मोमोज आणि सँडविच यासारख्या पदार्थाची चव मेयोनेज नसेल तर एकदम साधी वाटते. मेयोनीजचे क्रीमी टेक्स्चर बहुतांश लोकांना आवडते. पण तुम्हाला माहित आहे का? मेयोनेजचे अति प्रमाणात सेवन केल्याने आरोग्याला अनेक दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. होय! मेयोनेजचे अति प्रमाणात सेवन केल्याने तुम्ही गंभीर आजारांच्या विळख्यात येऊ शकतात. मेयोनेज खूप खाल्ल्याने आरोग्याला पुढील तोटे भोगावे लागू शकतात.

रक्तदाब वाढू शकतो (Blood pressure may increase-Mayonnaise Side Effects)

मेयोनेजचे अति प्रमाणात सेवन केल्याने रक्तदाबाची समस्या वाढू शकते. कारण मेयोनेजमध्ये ओमेगा 6 फॅटी ॲसिडचे प्रमाण खूप जास्त आढळून येते, ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. त्याचबरोबर मेयोनेजचे अति प्रमाणात सेवन केल्याने हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यासारख्या आजाराचा धोका वाढू शकतो.

वजन वेगाने वाढते (Weight gain is rapid-Mayonnaise Side Effects)

मेयोनेजचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने वजन झपाट्याने वाढू शकते. कारण यामध्ये कॅलरीज मोठ्या प्रमाणात आढळून येतात. त्याचबरोबर यामध्ये फॅट देखील भरपूर प्रमाणात आढळून येते. मेयोनेज जास्त प्रमाणात खाल्ल्याने तुम्हाला लठ्ठपणाच्या समस्येला झुंज द्यावी लागू शकते.

रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते (Blood sugar levels may increase-Mayonnaise Side Effects)

मेयोनेजचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. परिणामी याच्या अतिसेवनाने डायबिटीसचा धोका वाढू शकतो. तुम्ही जर डायबिटीसचे रुग्ण असाल तर तुम्ही मेयोनेज खाणे टाळले पाहिजे.

हृदयरोगाचा धोका वाढतो (The risk of heart disease increases-Mayonnaise Side Effects)

मेयोनेजच्या अति सेवनाने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. कारण एक चमचा मेयोनेजमध्ये सुमारे 1.6 ग्रॅम सॅच्युरेटेड फॅट आढळून येते, जे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवू शकतात. शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी मेयोनेजचे सेवन नियंत्रणात केले गेले पाहिजे.

टीप: वरील माहितीबद्दल संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Papaya Benefits | फक्त पोटासाठीच नाही तर त्वचेसाठी देखील खूप फायेशीर आहे पपई, जाणून घ्या सविस्तर

Milk and Turmeric | चेहऱ्याची नैसर्गिक पद्धतीने काळजी घेण्यासाठी दूध आणि हळदीचा ‘या’ प्रकारे करा वापर

Breast Pain | महिलांनो लक्ष द्या! ब्रेस्ट पेन होत असेल तर करा ‘हे’ घरगुती उपाय

Belpatra Leaves | बेलपत्राचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Beauty Tips | गुलाबासारखी कोमल आणि चमकदार त्वचा हवी असेल, तर गुलाबाचा ‘या’ पद्धतीने करा वापर