Share

IND vs NZ: टीम इंडियाला दुसरा मोठा धक्का! पंतनंतर आता ‘हा’ मॅचविनरही मालिकेतून बाहेर

विजयानंतर भारताला मोठा धक्का! अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर; त्याच्या जागी आता ‘हा’ युवा स्टार मैदानात गाजवणार मैदान.

Published On: 

Washington Sundar Ruled Out: 'या' युवा खेळाडूची एन्ट्री

🕒 1 min read

मुंबई – भारतीय संघाची पाठ दुखापती काही सोडायला तयार नाहीत, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. वडोदरा वनडेत न्यूझीलंडला लोळवून भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली खरी, पण या विजयाचा आनंद साजरा करण्याआधीच टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे. ऋषभ पंतनंतर आता अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) दुखापतीमुळे उर्वरित वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे.

वडोदरा येथील पहिल्या वनडेत गोलंदाजी करताना सुंदरला ‘साईड स्ट्रेन’चा (Side Strain) त्रास जाणवू लागला. वेदना होत असतानाही त्याने हिंमत न हारता ५ षटके टाकली आणि २७ धावा दिल्या. पण खरा ड्रामा दुसऱ्या डावात घडला. भारताला विजयासाठी २२ चेंडूत २२ धावांची गरज असताना सुंदर ८ व्या क्रमांकावर फलंदाजीला आला.

Washington Sundar Ruled Out

के.एल. राहुलने (KL Rahul) सामन्यानंतर सांगितलं की, “सुंदरला धावताना त्रास होत होता, याची मला कल्पना नव्हती. पण तरीही त्याने चिवटपणे बॅटिंग केली.” सुंदरने वेदनेत असतानाही नाबाद ७ धावा करत टीमला विजय मिळवून दिला. मात्र, सामन्यानंतर हर्षित राणाने (Harshit Rana) कन्फर्म केलं की सुंदरची दुखापत गंभीर आहे.

सुंदर आता राजकोट (१४ जानेवारी) आणि इंदूर (१८ जानेवारी) येथे होणाऱ्या सामन्यांत खेळू शकणार नाही. याआधीच ऋषभ पंत दुखापतीमुळे बाहेर पडला असून त्याच्या जागी ध्रुव जुरेलला संधी मिळाली होती. आता बीसीसीआयने (BCCI) सुंदरच्या जागी दिल्लीचा युवा आणि आक्रमक फलंदाज आयुष बदोनी (Ayush Badoni) याची संघात निवड केली आहे. आयपीएलमध्ये आपल्या फटकेबाजीने गाजवणारा आयुष आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)