🕒 1 min read
विरोधी संघात जेव्हा जगातील सर्वात खतरनाक फलंदाज असतात, तेव्हा समोरच्या टीमची झोप उडणं साहजिकच आहे. आज राजकोटच्या मैदानात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा वनडे सामना रंगणार आहे, पण त्याआधीच किवी गोटातून एक मोठी कबुली समोर आली आहे. न्यूझीलंडचा फलंदाज निक केली (Nick Kelly) याने थेट मान्य केलंय की, भारतीय दिग्गज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची आम्हाला भीती वाटते.
पहिल्या सामन्यात भारताने ४ विकेट्सने विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्यासाठी Team India सज्ज आहे. यावर बोलताना निक केली म्हणाला, “जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंसोबत (Best in the World) खेळणं ही एका फॅन म्हणून पर्वणी असते, पण मैदानात उतरणाऱ्या आमच्या खेळाडूंसाठी ते मोठं आव्हान आहे. त्यामुळे रोहित आणि विराटने जास्त धावा करू नयेत, एवढीच आमची आशा (Hope) आहे.” किवी खेळाडूच्या या विधानावरून भारतीय फलंदाजांचा दरारा स्पष्ट दिसून येत आहे.
Nick Kelly Statement On Rohit Virat
पहिल्या सामन्यात विराट कोहलीने ९३ धावांची खेळी करत भारताचा पाया रचला होता, तर के.एल. राहुलने २९ धावा करत फिनिशिंग टच दिला होता. “मागील सामना खूप अटीतटीचा झाला होता. गेल्या २४ ते ४८ तासांत आम्ही खूप चर्चा केली आहे. आज आम्ही १-१ अशी बरोबरी करण्यासाठीच मैदानात उतरू,” असंही निक केलीने स्पष्ट केलं.
दुसरीकडे, भारतीय संघात एक सक्तीचा बदल करण्यात आला आहे. अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे बाहेर पडल्याने त्याच्या जागी युवा फटकेबाज आयुष बदोनी (Ayush Badoni) याची स्क्वाडमध्ये एन्ट्री झाली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात राजकोटची खेळपट्टी फलंदाजांना साथ देणार की गोलंदाज बाजी मारणार, आणि रोहित-विराट किवींची ‘प्रार्थना’ मोडीत काढणार का? हे पाहणं रोमांचक ठरणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- निवडणुकीचे नियम बदलले? प्रचार संपला तरीही उमेदवारांना ‘ही’ मुभा; आयोगाचा निर्णय वाचून तुम्हीही चक्रावाल!
- ZP Election: अखेर बिगुल वाजले! १२ जिल्ह्यांत ‘या’ तारखेला मतदान; तुमचं गाव यादीत आहे का?
- Post Office Scheme : पोस्टाच्या ‘या’ योजनेमध्ये पैसे होणार थेट दुप्पट! एकदा गुंतवा अन् टेंशन विसरा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










