कोल्हापूर, 17 ऑक्टोबर: कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाची निवडणूक आता एका वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचली आहे. निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून महायुतीच्या नेत्यांनी मतदारांना (ठराव धारकांना) चक्क रेणुका देवीच्या परडीवर हात ठेवून निष्ठेची शपथ घ्यायला लावली आहे. सौंदत्ती डोंगरावर घडलेल्या या प्रकाराचा स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
गोकुळ संघाच्या या प्रतिष्ठेच्या निवडणुकीसाठी मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी कंबर कसली आहे. सध्या ही निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून सर्व सभासदांना मतदानापूर्वी सहलीवर पाठवण्यात आले आहे. याच सहलीदरम्यान, सौंदत्ती डोंगरावर मंत्री हसन मुश्रीफ, भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक आणि माजी खासदार संजय मंडलिक यांच्या उपस्थितीत महायुतीकडून ठराव धारकांना ही शपथ देण्यात आली.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हसन मुश्रीफ सभासदांना उद्देशून बोलताना दिसत आहेत. "माझ्यासह सर्वांना शपथ घ्यायची आहे की, मी गद्दारी करणार नाही. खरंतर त्यासाठी दोन अडीच तास लागतील. कागलची आणि आपल्या तालुक्याची अब्रू वाचवणं आता तुमच्याच हातात आहे. कोणताही खेळ करू नका, तुम्हाला आमची शपथ आहे," असे मुश्रीफ म्हणाले. तसेच, 'खोटं वागल्यास जागृत असलेली यल्लमा देवी अंगावर उठते', असेही ते म्हणाले.
शपथविधीनंतर हसन मुश्रीफ यांनी जागृत देवस्थान रेणुका देवीचे मनोभावे दर्शन घेतले. कोल्हापूर जिल्हा सहकारी उत्पादक संघाच्या निवडणुकीत 'छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी'चे सर्व उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येऊ दे, असे साकडे त्यांनी देवीच्या चरणी घातले. दुसरीकडे, याच ठिकाणचा खासदार धनंजय महाडिक यांचाही शपथ घेतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.
या व्हिडिओत खासदार महाडिक म्हणतात की, "आमची कॉलर खाली होता कामा नये, ती ताठ राहिली पाहिजे. तुमच्यासोबत आम्ही देखील शपथ घेणार आहे." तसेच, निवडणुकीत महायुतीच्या सर्व उमेदवारांना मतदान करायचे असून 'कपबशी'ला मतदान करणार असल्याची शपथ त्यांनी आई यल्लमाचे नाव घेऊन घेतली.
📌 महत्वाच्या बातम्या
- मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मोठा ट्विस्ट! एका रात्रीत वाद मिटला, सतीश चव्हाणांना शिंदेसेनेचा पुन्हा पाठिंबा
- न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी संघातून मानव सुथार आणि गुरनूर ब्रार यांना का वगळलं?
- बीसीसीआयच्या मुख्य निवड समिती अध्यक्षपदी वसीम जाफर यांच्या नावाची चर्चा; रमेश पोवार यांचाही अर्ज
Quick Answers
निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून महायुतीच्या नेत्यांनी मतदारांना (ठराव धारकांना) रेणुका देवीच्या परडीवर हात ठेवून निष्ठेची शपथ घ्यायला लावली.
हा प्रकार सौंदत्ती डोंगरावर घडला. त्या वेळी मंत्री हसन मुश्रीफ, भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक आणि माजी खासदार संजय मंडलिक उपस्थित होते.
माझ्यासह सर्वांना 'मी गद्दारी करणार नाही' अशी शपथ घ्यायची आहे, कागलची आणि आपल्या तालुक्याची अब्रू वाचवणे तुमच्याच हातात आहे, असे हसन मुश्रीफ म्हणाले. तसेच खोटं वागल्यास जागृत असलेली यल्लमा देवी अंगावर उठते, असेही त्यांनी नमूद केले.
खासदार धनंजय महाडिक यांनी निवडणुकीत महायुतीच्या सर्व उमेदवारांना मतदान करायचे असून 'कपबशी'ला मतदान करणार असल्याची शपथ आई यल्लमाचे नाव घेऊन घेतली.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








