Share

गौतमी पाटीलचा किणी टोलनाक्यावर ‘धुरंधर’ डान्स; अक्षय खन्नाची स्टेप पाहून पब्लिक फिदा!

गौतमी पाटीलने किणी टोलनाक्यावर अक्षय खन्नाच्या ‘धुरंधर’ गाण्यावर भन्नाट डान्स केला. काळा गॉगल आणि हुक स्टेप पाहून चाहते घायाळ!

Published On: 

Gautami Patil Dance: किणी टोलनाक्यावर 'धुरंधर' डान्स Viral

🕒 1 min read

मुंबई – सध्या महाराष्ट्रात एकाच गोष्टीची चर्चा आहे ती म्हणजे ‘धुरंधर’ सिनेमा आणि अक्षय खन्नाचा डान्स. या ट्रेंडमध्ये आता महाराष्ट्राची ‘सबसे कातिल’ नृत्यांगना उतरली तर काय होईल? याचाच प्रत्यय नुकताच आलाय. तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या गौतमी पाटीलने (Gautami Patil) पुन्हा एकदा सोशल मीडियावर मोठी खळबळ उडवून दिली आहे.

एरवी आपल्या लावणी आणि स्टेज शोमुळे चर्चेत राहणाऱ्या गौतमीने यावेळी चक्क हायवेवरचा टोलनाका गाजवला आहे. कोल्हापूरच्या किणी टोलनाक्यावर गौतमीने ‘धुरंधर’ (Dhurandhar) चित्रपटातील सुपरहिट ठरलेल्या ‘Fa9la’ या गाण्यावर ताल धरला. सध्या बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने रेकॉर्ड तोड कमाई केली असतानाच, गौतमीनेही या ट्रेंडमध्ये उडी घेत चाहत्यांना सरप्राईज दिलं आहे.

Gautami Patil Dance

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये गौतमीचा अंदाज पाहण्यासारखा आहे. डोळ्यावर काळा गॉगल, मोकळे सोडलेले केस आणि अक्षय खन्नाची (Akshay Khanna) ती व्हायरल ‘हुक स्टेप’ गौतमीने हुबेहूब साकारली आहे. तिचा हा स्वॅग पाहून तिथून जाणारे प्रवासीही पाहतच राहिले असतील, यात शंका नाही.

हा व्हिडीओ समोर येताच सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. एका चाहत्याने लिहिलंय, “मस्तच… सबसे कातिल गौतमी पाटील,” तर दुसऱ्याने “परफेक्ट स्टेप्स” म्हणत तिचं कौतुक केलंय. अक्षय खन्नाच्या डान्सची क्रेझ आहेच, पण गौतमीने त्याला आपल्या स्टाईलचा तडका दिल्याने हा व्हिडीओ सध्या सुसाट व्हायरल होत आहे.

Gautami Patil Dance Link- https://www.instagram.com/reel/DSmvzOUEpSY/

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)