🕒 1 min read
मुंबई – लंडनहून आलेल्या डॉ. संग्राम पाटील (Dr Sangram Patil) यांना पोलिसांनी का अडवलं? त्यांच्यावर गुन्हा का दाखल झाला? या प्रश्नांनी संपूर्ण महाराष्ट्रात एकच गोंधळ उडाला होता. पण आता या प्रकरणाचं मूळ असलेलं ‘ते’ वादग्रस्त कारण समोर आलं असून, त्यात मोदी यांचा उल्लेख असल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या वादात आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे (Ravikant Varpe) यांचीही एन्ट्री झाली आहे.
Dr Sangram Patil Social Media Post
मुंबई (Mumbai) भाजपने सायबर पोलिसांत धाव घेत ज्या पोस्टवर आक्षेप घेतला होता, तो मजकूर आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. १४ डिसेंबर २०२५ रोजी डॉ. संग्राम पाटील यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून एक पोस्ट करण्यात आली होती. यात “मोदींच्या सेक्स स्कँडल बद्दल भाजपा अंध भक्त आणि 40 पैसेवाले सगळे चिडीचूप आहेत..” असा आक्षेपार्ह दावा करण्यात आला होता. याच पोस्टमुळे भाजपचे सोशल मीडिया संयोजक निखिल भामरे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, त्यानुसार ‘शहर विकास आघाडी’ आणि डॉ. पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
रविकांत वरपेंची कमेंट चर्चेत!
या प्रकरणाला आता राजकीय वळण लागलं आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राज्य प्रवक्ते रविकांत वरपे यांच्या एका कमेंटमुळे. डॉ. पाटलांच्या या वादग्रस्त पोस्टखाली वरपे यांनी, “मोदींनी चीन ला का घाबरत असतील?” असा सवाल उपस्थित करणारी कमेंट केल्याचे दिसून आले आहे. एका बाजूला भाजप या पोस्टला ‘समाजात तेढ निर्माण करणारे कृत्य’ म्हणत असताना, मविआच्या पदाधिकाऱ्याने तिथे कमेंट केल्याने भाजपच्या गोटात संताप व्यक्त होत आहे.
नेमकं प्रकरण काय?
‘शहर विकास आघाडी’ आणि ‘डॉ. संग्राम पाटील’ या पेजेसवरून भाजप नेत्यांची बदनामी आणि महिलांबद्दल अश्लील टिप्पणी केल्याचा आरोप फिर्यादीत आहे. सध्या त्यातील काही लिंक्स डिलीट करण्यात आल्या असल्या तरी, त्याचे स्क्रीनशॉट्स समोर आले आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- “सत्तेचा माज की कायद्याचा बडगा? ‘त्या’ एका पोस्टमुळे डॉ. संग्राम पाटलांवर गुन्हा; पवार ॲक्शन मोडवर!”
- लंडनहून येताच डॉ. संग्राम पाटलांना पोलिसांनी घेरलं; विरोधकांचा सरकारला थेट इशारा, “सुटका करा, अन्यथा…”
- फडणवीस-शिंदेंना तुरुंगात टाकण्याचा डाव? रश्मी शुक्लांच्या ‘त्या’ रिपोर्टने राजकारणात भूकंप!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








