🕒 1 min read
मुंबई – राजकारणात गर्दी जमवण्यासाठी काय काय शक्कल लढवली जाते, याचा एक संतापजनक आणि तितकाच हास्यास्पद प्रकार शिवाजी पार्कवर उघड झालाय. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी चक्क “पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) येणार आहेत” अशी थाप मारून महिला आणि कामगारांना (Fake Crowd) आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये नेमकं सत्य काय आहे, हे पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
Fake Crowd in Devendra Fadnavis – Eknath Shinde Sabha
“आम्हाला सांगितलं मोदी येणार…”
सभेत उपस्थित असलेल्या काही महिला आणि तरुण मुलींच्या ग्रुपला पत्रकाराने विचारले की, ‘तुम्ही कोणाला बघायला आलात?’, तेव्हा त्यांनी निरागसपणे “मोदीजींना” असे उत्तर दिले. जेव्हा पत्रकाराने सांगितलं की आज मोदींची सभा नाही, तेव्हा त्यांचा चेहरा पडला. “आम्ही मानखुर्दहून आलोय, आम्हाला मतं मागायला जे आले होते, त्यांनी सांगितलं मोदी आणि फडणवीस येणार आहेत,” असा गौप्यस्फोट या महिलांनी केला. म्हणजे केवळ खुर्च्या भरण्यासाठी सर्वसामान्यांची फसवणूक झाली का? असा सवाल आता विचारला जातोय.
नुसती फसवणूकच नाही, तर काहींना चक्क जबरदस्तीने आणल्याचेही समोर आले आहे. एका व्यक्तीने कॅमेऱ्यासमोर कबूल केले की, “आमचा घरमालक (Makan Malik) पार्टीचा प्रेसिडेंट आहे. त्याने सांगितलंय की आमची मिटिंग आहे, तुम्हाला जावंच लागेल.” त्यामुळे आजची सुट्टी आणि पगार (दिहाडी) बुडवून सभेला आल्याचे या कामगारांनी सांगितले. हे लोक ‘समर्थक’ आहेत की ‘वेठबिगार’? हा व्हिडिओ पाहून प्रश्न पडतो.
सभेतील गोंधळ इथेच संपत नाही. एका व्यक्तीला विचारलं की कोणाची सभा आहे, तर त्याने चक्क “शिराज सिंग” (बहुदा शिवराज सिंग म्हणायचे असावे) असं उत्तर दिलं. तर दुसऱ्या एकाने “शिवाजी की मिटिंग है” असं म्हणत शिवाजी पार्क या मैदानाच्या नावालाच व्यक्ती समजून उत्तर दिलं. कोलकाता (Kolkata) आणि मध्य प्रदेशातून (MP) आलेल्या या कामगारांना कामाच्या ठिकाणावरून थेट आणल्याचं या संवादातून स्पष्ट होत आहे.
ज्या मराठी अस्मितेच्या जोरावर शिवसेना उभी राहिली, त्याच शिवसेनेच्या (Eknath Shinde गट) सभेला गर्दी जमवण्यासाठी परप्रांतीय कामगार आणि खोट्या आश्वासनांचा आधार घ्यावा लागल्याने विरोधकांनी आता टीकेची झोड उठवली आहे.
NDA hiring people from Madhya Pradesh and West Bengal to fill seats at a rally in Mumbai. pic.twitter.com/efO7mciBsN
— Mohammed Zubair (@zoo_bear) January 12, 2026
📌 महत्वाच्या बातम्या
- “देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मालक..”; शिंदेंच्या नेत्याला सुनावताना भाजप नेत्याची जीभ घसरली!
- “महाराष्ट्रात निवडणुका, पण गाड्या परप्रांतीय?”; भाजपच्या ‘त्या’ गाड्या पाहून संताप, भाडं ऐकून डोळे फिरतील!
- “शिंदे जिगरी, अजितदादा जवळचे, पण उद्धव ठाकरे…”; फडणवीसांनी लावली मित्रांची ‘रँकिंग’, ठाकरेंबद्दल मोठं विधान!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










